विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) तोंडावर नवी मुंबईच्या भाजपामधला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातले वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. मंदा म्हात्रे या भाजपाच्या बेलापूरच्या आमदार आहेत, पण मंदा म्हात्रे यांच्या या मतदारसंघावर गणेश नाईक यांनी दावा ठोकला आहे, त्यामुळे हे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यातच नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघ ज्यामध्ये बेलापूर, ऐरोली मतदारसंघ भाजपाकडे असल्याने शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय नहाटा मात्र नाराज आहेत. त्यांनी तर थेट बंडाचा झेंडा हातात घेत शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. शुक्रवारी झालेल्या मुख्यमंत्री तसेच खासदार मस्के यांच्या बैठकीत नवी मुंबईत आपल्याला एक विधानसभा हवीच असा आग्रह देखील धरल्याचे कळते.
(हेही वाचा – BMC K North Ward Office : महापालिकेच्या के उत्तर विभाग कार्यालयाचे लोकार्पण, प्रशासकीय कार्यालयांची संख्या आता झाली २६)
नवी मुंबईतील दादा आणि ताई अर्थात गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांचं राजकीय वैर उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. दोघंही एकाच पक्षाचे, भाजपाचे आमदार आहेत, पण दोघांमध्ये विस्तवही जात नाही. निवडणुका जाहीर होण्यास काही दिवस उरले असताना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्वपक्षाचे आमदार गणेश नाईक यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले. तर या दोघांच्याही आपसातील भांडणाचा फायदा उठवत नवी मुंबईतील किमान एक तरी विधानसभा आपल्या पदरात पाडता येते का ? यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून प्रयत्न सुरू केले गेले आहेत. (Assembly Election 2024)
भाजपाच्या दोन्ही आमदारांमध्ये आपसात होत असलेल्या कलहाचा फायदा कुठेतरी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी उठवावा असाच काहीसा प्रयत्न दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community