Assembly Election 2024 : आचारसंहिता म्हणजे नक्की असतं तरी काय?

75
Assembly Election 2024 : आचारसंहिता म्हणजे नक्की असतं तरी काय?
  • प्रतिनिधी 

देशात स्वतंत्र आणि निष्पक्षपातीपणे निवडणुका व्हाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घातले आहेत. याच नियमांना आचारसंहिता म्हणतात. निवडणुकीत सहभागी होणाऱ्या सगळ्या पक्षांनी आणि उमेदवारांनी ही आचारसंहिता पाळणे अनिवार्य आहे. एखाद्या उमेदवाराने किंवा राजकीय पक्षाने आचारसंहितेचे उल्लंघन केले तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – UBT ला धक्का; संभाजी ब्रिगेडने सोडली साथ)

आचारसंहितेची सुरुवात कशी झाली?

आता या आचारसंहितेची सुरुवात कशी झाली? आचारसंहितेची सुरुवात १९६० च्या केरळ विधानसभा निवडणुकीपासून झाली. राजकीय पक्षांशी सल्लामसलत करून त्यांच्या सहमतीने आचारसंहिता तयार करण्यात आली. कुठल्या कुठल्या नियमांचे पालन करणार, हे पक्ष आणि उमेदवारांनी ठरवले. १९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर १९६७ च्या लोकसभा आणि सर्व विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात आली. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – अंडरवर्ल्ड डॉन Chhota Rajan ला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा!)

आचारसंहिता मोडणाऱ्या उमेदवाराला निवडणूक लढवण्यास बंदी घातली जाऊ शकते. गंभीर गोष्ट असेल तर कायदेशीर गुन्हा दाखल केला जातो आणि कारावासाच्या शिक्षेची तरतूदही आहे. त्यामध्ये नवनव्या गोष्टी आणि नियम जोडले जाऊ लागले. निवडणूक आचारसंहिता हा कुठल्याही कायद्याचा भाग नाही. पण आचारसंहितेतील काही नियम आयपीसीच्या कलमांच्या आधारे लागू करण्यात येतात. तरीही अनेकदा राजकीय पक्ष आणि उमेदवार आचारसंहितेच्या अटी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे दर वेळी कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्ष किंवा उमेदवारांवर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई होताना दिसते. राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांचं सर्वसामान्य वर्तन कसं असावं, याविषयी माहिती दिली आहे, तसंच प्रचारसभा, मिरवणुका, रॅली काढण्याविषयी नियम निवडणूक आणि अटी दिलेल्या आहेत. मतदानाच्या दिवशी उमेदवार आणि पक्षाचा व्यवहार कसा असावा,यात अनेक नियमांचा या आचारसंहितेत समावेश आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Mahayuti चे १८२ उमेदवार जाहीर; MVA चा तिढा अजून कायम)

नियम व अटी
  • निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर या आचारसंहितेच्या नियमांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
  • यात लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाही.
  • शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
  • सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे.
  • कुठल्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते.
  • कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
  • जातीधर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे.
  • कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर, पत्रके असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक.
  • विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नाही.
  • मतदानाच्या दिवशी दारूची दुकाने बंद असतात.
  • प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई
  • मतदानाच्या दिवशी लागणारे पक्षांचे बूथ साधेपणानेच लावलेले असावेत.
  • प्रचारसाहित्य किंवा मतदारांना भुलवणारी कुठलीही गोष्ट तिथे असता कामा नये.
  • मतदारांसाठी कुठलीही खाण्यापिण्याची व्यवस्था तिथे नसावी.
  • राजकीय कार्यक्रमांवर लक्ष ठेवायला निवडणूक आयोग निरीक्षक नियुक्त करतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.