- प्रतिनिधी
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होत असल्याचा ‘एक्झिट पोल’च्या आकडेवारीला गुप्तचर सूत्रांनी सहमती दर्शवली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या आकडेवारीत मोठी तफावत नसली तरी सरकार स्थापनेसाठी महायुती सर्वात पुढे असेल असेही गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांकडून शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुंबईत देखील महायुती ४ ते ५ फरकाने पुढे असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईत दोन उमेदवार निवडून येणार असल्याची शक्यता गुप्तचर सूत्रांनी वर्तवली आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – BMC : मालमत्ता कर न भरणाऱ्या पहिल्या १० थकबाकीदारांची नावे जाहीर; सुमारे ६०० कोटींच्या वसुलीसाठी जारी केल्या नोटीस)
राज्यातील विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल येण्यासाठी आता फक्त ४८ तास उरले आहे. राज्यात सरकार कोण स्थापन करणार म्हणून सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ‘एक्झिट पोल’च्या आकडेवारीने सरकार कोण स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी शनिवारी याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. ‘एक्झिट पोल’ने दिलेल्या आकडेवारीला गुप्तचर यंत्रणांकडून सहमती दर्शवली आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी रचला मोठा इतिहास; नेहरू अन् इंदिरा गांधींनाही मागे टाकले, हे आहे कारण)
गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात महायुतीचे सरकार येईल, मात्र सरकार स्थापन करण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागेल असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीकडून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु त्यांना ‘जादुई आकडा’ गाठता येणार नाही. मुंबईत महायुती १६ ते १८ तर महाविकास आघाडी १४ ते १६ अशी संख्या असेल. तर मनसेचे दोन उमेदवार मुंबईत निवडून येण्याची शक्यता गुप्तचर सूत्रांनी वर्तवली आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community