विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. सर्वत्र प्रचार सभा, रोड शो सुरु आहे. त्याचवेळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे पथकही डोळ्यात तेल घालून सक्रीय आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे (Voting) प्रमाण वाढवण्यासाठी निवडणूक आयोग आणि मुंबई महापालिकेकडून (BMC) विविध उपक्रम आणि जनजागृतीचे (Maharashtra Voting Awareness) कार्यक्रम राबवले जात आहेत. मतदान केल्यानंतर ‘बोटावरची शाई दाखवा आणि वेगवेगळ्या सवलती मिळवा’, अशा आशयाच्या थेट योजनाच जाहीर करण्यात आल्या आहेत. (Assembly Election 2024)
येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान नामवंत कलाकार, प्रतिष्ठीत नागरिक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू आदी सातत्याने मतदारांना आवाहन करत आहेत. मुंबईत यापूर्वीच्या निवडणुकामध्ये मतदानाचे प्रमाण राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कमी होते. ते यंदाच्या विधानसभा निवडणुकीत वाढावे, यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याकरिता मुंबई महापालिका आयुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी (Bhushan Gagrani) यांच्या मार्गदर्शनाखाली निरनिराळे प्रयत्न करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Jharkhand Assembly Election : निवडणुकीच्या जाहीरनाम्यामुळे काँग्रेसची फजिती)
प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आणि सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाही नियोजन करून जनजागृती केली जात आहे. प्रत्येक मुंबईकर मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबविले जात आहेत. त्याला प्रतिसाद देत वेगवेगळ्या व्यावसायिक संघटना, संस्था, समूहही मतदान जनजागृती उपक्रमांमध्ये आपल्यापरीने हातभार लावत आहेत. त्याही पुढे जाऊन मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी थेट सवलती जाहीर केल्या आहेत
(हेही वाचा – Ranji Trophy 2024 : रणजी करंडकात एकाच दिवशी संघातील दोघांची त्रिशतकं! गोव्याच्या खेळाडूंची धावांची लूट)
मतदान केल्यानंतर आपल्या बोटावरील शाई दाखवा आणि २०, २१ आणि २२ नोव्हेंबर या दिवसांत १० ते १५ टक्के सवलत प्राप्त करा, अशा आशयाच्या या सवलती असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तसेच महाराष्ट्र रिटेलर्स असोसिएशन (Maharashtra Retailers Association), उपाहारगृह व्यावसायिकांची संघटना असलेली आहार संघटना, चित्रपटगृह व्यावसायिकांची संघटना याच्यासह इतरही अनेक खासगी उद्योगसमूह, व्यावसायिक आस्थापना यांनीदेखिल आपल्या स्तरावर ग्राहकांसाठी सवलती (Voting discount) जाहीर केल्या आहेत.
हेही पाहा –