महाराष्ट्रात विधानसभा (Maharashtra Assembly 2024) निवडनूकीची सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. राज्यात येत्या काही दिवसांत निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील. मात्र निवडणुकीपूर्वीच भाजपाच्या उमेदवारांची यादी जवळपास फायनल झाली आहे. राज्यात भाजपा १५० ते १६० जागा लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन त्याला अंतिम मंजूरी दिली जाणार आहे. यासाठी भाजपाची वरिष्ठ मंडळी सोमवार १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत. यानंतर भाजपाची पहिली यादी (Assembly First list of BJP) जवळपास अंतिम होण्याची शक्यता आहे. (Assembly Election 2024)
जागावाटप ठरले तरी महायुतीची यादी लांबणार
महायुतीमध्ये जागावाटपाचा फाॅर्म्युला ठरला आहे. भाजपा १६० जागा लढवणार आहे. उरलेल्या १२८ पैकी शिवसेना पक्षाला ८० जागा तर राष्ट्रवादी दादा गटाला ४८ जागा जवळपास निश्चित आहेत. यातून तिन्ही पक्षांना मित्रपक्षांना जागा सोडायच्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. स्वत: भाजपामध्येही छुपी बंडखोरी होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे पक्षशिस्तीमुळे उघडपणे भाजपातील कुणी बंडखोरी करण्याचे धाडस दाखवणार नाही.
मात्र, आतून विरोध होऊ शकतो. हे लक्षात घेता कोणती जागा, काेणत्या पक्षाला दिली जाणार हे जाहीर केले जाणार नाही. कारण ते माहिती झाले तर बाहेरून आलेले बंडखोरी करीत इतर पक्षात जाऊ शकतात. म्हणून आचारसंहिता जाहीर झाली तरी यादी जाहीर करण्याची घाई महायुती करणार नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपाने १५० ते १६० जागा लढवल्यास ९० ते ९५ जागा निवडून येऊ शकतात, असा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर कऱण्यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवार १४ ऑक्टोबर रोजी दिल्लीत पक्षाच्या हायकमांडसमोर उमेदवारांचे संपूर्ण सादरीकरण करणार आहेत.
(हेही वाचा – AAP सरकारचा दुटप्पीपणा दिल्लीत फटाक्यांवर बंदी, पंजाबमधील प्रदुषणाकडे दुर्लेक्ष)
गेल्या निवडणुकीत काय परिस्थिती होती?
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत (2019 Assembly Elections) भाजपने १६२ जागांवर निवडणूक लढवली आणि १०५ जागा जिंकल्या. त्यावेळी एकसंध असलेल्या शिवसेनेने १२४ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि त्यांना ५६ जागा मिळाल्या होत्या. यावेळी समीकरणे बदलली आहेत. तर संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेसने १२१ जागांवर उमेदवार उभे केले होते आणि ५४ जागा जिंकल्या होत्या. नंतर राष्ट्रवादीत बंडखोरी झाली आणि अजित पवारांसह बहुतांश आमदार महाआघाडीत सामील झाले. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणुक लढवली होती. (Assembly Election 2024)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community