Assembly Election 2024: मतदानासाठी पोलीस सज्ज! मुंबईत ३२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

37
राज्यात २८८ मतदार संघासाठी एकाच टप्प्यात निवडणूक येत्या २० नोव्हेंबरला होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मुंबईसह इतर भागात कोणत्याच प्रकारे अनुचित प्रकार घडू नये यासाठी ३२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात येणार आहे. (Assembly Election 2024)
निवडणूक कामांसाठी पोलीस तैनात  
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून मुंबई पोलीस (Mumbai Police) दलाने पाच अपर पोलीस आयुक्त, २० पोलीस उप आयुक्त, ८३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व २५ हजारांहून अधिक पोलीस अंमलदार, ०३ दंगल नियंत्रण पथके असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाचे जवानांना तैनात करण्यात आले आहे. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी २६ केंद्रीय सुरक्षा दले/राज्य सुरक्षा दले यांची निवडणूक (Election) कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – निवडणुक कालावधीत दगडफेक झाली तर जबाबदारी पोलिसांची; Jitendra Awhad यांची धमकी)
निवडणूक आयोगाने काय दिल्या सूचना?
मतदान केंद्रालगतच्या (Polling Station) १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरलेस यंत्रणा, तसेच परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगोफोनचा वापर करण्यास बंदी आहे. याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने (Election Commission of India) दिले आहेत.
१५ ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता (code of conduct) लागू झाल्यापासून, अधिकाऱ्यांनी रोख रक्कम, मौल्यवान धातू, दारू, अंमली पदार्थ आणि अंदाजे १७५ कोटी रुपयांच्या इतर वस्तू जप्त केल्या आहेत. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी एकूण ४,४९२ व्यक्तींना विविध कायद्यांतर्गत  प्रतिबंधित कारवाई करण्यात आली आहे.
सर्व मतदारांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी ९ नोव्हेंबर रोजी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जारी केलेल्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता, २०२३च्या कलम १६३ मधील नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.  मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघात (मतदान केंद्र क्षेत्र) आणि इतर ठिकाणी मतदारांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.  नागरिक मदतीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १००/१०३/११२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.