Assembly Election 2024 : मतदानावेळी कुठे राडा तर कुठे पैशांवरून गोंधळ

43
Assembly Election 2024 : मतदानावेळी कुठे राडा तर कुठे पैशांवरून गोंधळ
  • प्रतिनिधी

राज्यात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले असून महायुती आणि महाविकास आघाडीत चुरशीची लढत पाहायला मिळत होती. राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा धुराळा उडवला होता. गावगाड्यावर आपलेच वर्चस्व राहावं म्हणून राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सकाळपासूनच मतदानाच्या वेळी काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची तर काही ठिकाणी नेत्यांंमध्ये आरोप-प्रत्यारोप तसेच पैसे वाटपावरून गोंधळ उडताना पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी थेट जीवे मारण्याच्या धमक्या देखील देताना उमेदवार पाहायला मिळाले. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणूक मुंबईत गोंधळाविना)

ईव्हीएम मध्ये बिघाड

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती बस स्थानकातील विक्रम हायस्कूल येथील ‘ईव्हीएम’ तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे मतदानाच्या सुरूवातीलाच मतदारांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळले. तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर मात्र मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यात आली. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ उडाला आहे. यात मतदान केल्यानंतर मशीनवरील बटन दाबले असता ते दुसऱ्याच उमेदवाराला मतदान जात असल्याचा प्रकार होत आहे. यामुळे या केंद्रावरील मतदान प्रक्रिया काही वेळ थांबविण्यात आली आहे. यामुळे इगतपुरी मतदारसंघातील तळेगाव येथे गोंधळ उडाला आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – फेक नरेटिव्ह नव्हे, तर पॉझिटिव्ह कामच जनता निवडणार; CM Eknath Shinde यांचा विश्वास)

भुजबळ कांदे भिडले

नांदगाव या संवेदनशील मतदारसंघात बुधवारी मतदारांची ओळख पटविण्यावरून मोठा राडा झाला. हे मतदार परराज्यातून आणल्याचा दावा करण्यात आला होता. त्यांना डांबून ठेवल्याने हाय व्होल्टेज ड्रामा घडला. यावेळी आमदार सुहास कांदे आणि माजी खासदार समीर भुजबळ समोरा-समोर आल्याने हमरी-तुमरी झाली. पोलिसांच्या उपस्थितीतच हे घडले. यामध्ये थेट जीवे नारण्याच्या देखील धमक्या देण्यात आल्या. याचे चित्रीकरण माध्यमांच्या कॅमेरांमध्ये देखील कैद झाले आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला; म्हणाले, राज्याची दशा कुणी केली अन् दिशा कुणी दिली…)

मतदानाला रक्तरंजित गालबोट

सांगलीत महापालिकेचे माजी उपमहापौर विजय घाडगे यांच्यावर अहिल्यानगर, कुपवाड येथे गुंडांचा हल्ला केला. हातावर आणि बोटावर वार केले आहेत. किरकोळ वादातून हा हल्ला झाला त्यामुळे घाडगे यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यातील सर्वात चर्चित मतदारसंघ असलेल्या बारामतीमध्ये देखील कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडताना पहावयास मिळाली. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना तर एकमेकांना धमक्या देण्याचे सत्र पहावयास मिळाले. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Kedar Dighe यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल)

बोगस मतदानावरून गोंधळात गोंधळ

राज्यभरात विविध मतदारसंघांमध्ये बोगस मतदानाच्या प्रकारामुळे गोंधळात गोंधळ पहावयास मिळाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात धर्मापुरी बूथवर बोगस मतदान सुरू असल्याचा आरोप शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला आहे. सीसीटीव्ही बंद करून बोगस मतदान करण्यात येत असल्याच्या गंभीर आरोप केल्यामुळे मतदान केंद्रावर एकच गोंधळ उडाला आहे. परळी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या घाटनांदुर येथील ईव्हीएम देखील फोडण्यात आला. त्यानंतर याच भागामध्ये शरद पवार गटाचे कार्यकर्ते अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांबरोबर भिडताना देखील पाहावयास मिळाले आहेत.

एकंदर राज्यभरातले मतदानाच्या दिवशी प्रशासनेने जरी चूक बंदोबस्त केला असला तरी अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि अपक्ष एकमेकांना भिडताना दिसून आले. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.