Assembly Election 2024 : टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगलट; गुन्हा दखल

61
राज्यात विधानसभेचा निवडणुका (Assembly Election 2024) २० तारखेला पार पडत आहेत. त्यापूर्वी टपाली मतपत्रिकेला (Postal vote) सुरूवात झालीये. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केल्याप्रकरणी आता पोलिस शिपाईवर कारवाई करण्यात आलीये. पोलीस शिपाई रियाझ पठाण हा मूळचा साताराच्या कोरेगावचा आहे. मात्र, त्या दिवशी पोलिस आणि सरकारी कर्मचारी निवडणुकीच्या कर्तव्यावर असल्याने त्यांना मतदान करणे शक्य नसते. या पार्श्वभूमीवर टपाली मतदानाद्वारे पोलिसांना मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने (Election Commission) उपलब्ध करून दिली आहे. मात्र यादरम्यान टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  (Assembly Election 2024)
नेमकं प्रकरण काय?
14 नोव्हेंबर रोजी 257 कोरेगांव विधानसभा मतदार संघ (Koregaon Assembly Constituency) सातारासाठी पोलीस कर्मचाऱ्यांचे  टपाली मतदान घेण्यात आले. यावेळी टपली मतदान केल्यानंतर पोलिस कर्मचारी रियाझ याने मतपत्रिकेचा फोटो काढून गावी नातेवाईक आणि मित्र परिवाराला पाठवला. या व्हायरल झालेल्या टपाली मतपत्रिकेची चौकशी केल्यानंतर ही टपाली मतपत्रिका 184 भायखळा विधानसभा पोस्टल बॅलेट फॅसिलिटेशन सेंटर (Postal Ballot Facilitation Centre) येथून प्राप्त झाल्याचे समोर आले. पुढील तपासात मिळालेल्या माहितीनुसार हा अर्ज मुंबई मतदार यादी क्रमांक 47 मधील या पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आला होता. पोलीस चौकशीत संबधित पोलीस कर्मचाऱ्याने गुन्ह्याची कबूली दिली. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी गावदेवी पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारे टपाली मतदान प्रक्रियेची गोपनियता भंग केल्याप्रकरणी एका पोलिस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Mumbai Crime : मुंबईत ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या; बिहारमधून अपहरणकर्त्याला अटक)

टपाली मतदानाचा फोटो गावाकडे व्हॉट्सअॅप केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिवडी पोलीस ठाण्यात (Shivdi Police Station) पोलीस शिपाया विरोधात कलम 223 सह लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 128 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पोलीस कर्मचारी शिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला शिपाई रियाझ पठाण हा मूळचा साताराच्या कोरेगावचा आहे.

हेही पाहा –


Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.