- प्रतिनिधी, मुंबई
विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांसमोर कमकुवत उमेदवार देण्यासाठी उबाठा शिवसेनेतील काही हात काम करत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून ही चर्चा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधून ऐकायला मिळत येत असून मातोश्रीवर वजन असलेल्या व्यक्तीला हाताशी धरून हे कमकुवत उमेदवार देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असा प्रयत्न सुरु असल्याने शिवसेनेच्या उमेदवारांपुढे उबाठा शिवसेनेकडून मजबूत उमेदवाराऐवजी कमकुवत उमेदवारांची नावे चालवून त्यांच्या भेटीगाठीही मातोश्रीवर करून देण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : मालाडमधून शेलारांना उमेदवारी, अस्लमसाठी फुलटॉस की यॉर्कर ?)
आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पाहत असतानाच या पक्षातील काही नेते मात्र जुनी मैत्री जपण्यासाठी शिवसेनेतील विद्यमान आमदारांना छुपी मदत करत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आणि उबाठा शिवसेनेमध्ये ३६ आकडा असला तरी काही जुन्या मैत्रीचा ओलावा आजही कायम असून याच मैत्रीला जागून उबाठा पक्षातील काही नेते मंडळी ही शिवसेनेततील आमदारांपुढे कमकुवत उमेदवार कशाप्रकारे देता येईल यासाठी उद्धव ठाकरेंच्या भेटी गाठी करून देत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंची भेट घेणे हे अवघड असले तरी मातोश्रीवर वजन असलेल्या नेत्यांपैंकी काही मंडळीच यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा शिवसैनिकांमधूनच ऐकायला मिळत आहे. मुंबईतील काही महत्वाच्या मतदारसंघांमध्ये जुनी मैत्री जपण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याने उद्धव ठाकरेही उमेदवारी जाहीर करताना सावध पवित्रा घेताना दिसत आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community