- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल ११ जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना लढत पहायला मिळणार आहे. मात्र, या अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने असून या ११ विधानसभांमध्ये दोन्ही शिवसेनेमध्ये चुरस पहायला मिळणार आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Amit Thackeray यांना अडचणीत आणण्याचा उबाठाचा डाव; निवडणूक आयोगाला दिले पत्र)
मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैंकी भायखळा, माहीम, वरळी, कुर्ला, अंधेरी पूर्व, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, विक्रोळी, भांडुप आणि चेंबूर मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे. यापैंकी माहीम विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेचे अमित ठाकरे निवडणूक रिंगणात उतरल्याने शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे निवडणुकीतून पक्षाच्या सुचनेनुसार आपला अर्ज मागे घेतील असे बोलले जात आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांनी अर्ज मागे घेतल्यास उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांनाही आपला अर्ज मागे घेण्याचा दबाव वाढला जाऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत मनसेचे अमित ठाकरेंच्या उमेदवारींमुळे प्रत्यक्षात याठिकाणी तिरंगी लढत होईल की दोघांनी अर्ज मागे घेतल्यास एकतर्फी निवडणूक होईल याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन)
मात्र, शिवसेना विरुद्ध उबाठा शिवसेना अशी लढत शिवडीतही होऊ शकली असती, परंतु याठिकाणी शिवसेनेने आपला उमेदवार दिलेला नाही. मात्र, या व्यतिरिक्त सर्वांत चुरस निर्माण करणारी लढत ही वरळी, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी पूर्व, मागाठाणे, विक्रोळी आणि चेंबूर या मतदारसंघात होणार आहे. मात्र, भांडुप, कुर्ला या विधानसभा मतदारसंघात तेवढी चुरस दिसणार नाही. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community