Assembly Election 2024: कॅश व्हॅन पाठोपाठ आता ट्रॅकमध्ये सापडली ८० कोटींची चांदी, पुढील तपास सुरू

57

विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) प्रचाराचा अंतिम टप्पा सुरु झाला आहे. सर्वत्र प्रचार सभा, रोड शो सुरु आहे. त्याचवेळी पोलीस आणि निवडणूक आयोगाचे (Election Commission) पथकही डोळ्यात तेल घालून सक्रीय आहे. दरम्यान राज्यातील पोलिस यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. ठिकठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात आली असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. तपासादरम्यान, मुंबई पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक ट्रकमधून तब्बल ८,४७६ किलो चांदी जप्त (8476 kg of silver seized) करण्यात आली आहे. तर यापूर्वी मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरात अशीच पद्धतीत चांदी सापडली होती. (Assembly Election 2024 )

मुंबई पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या या चांदीची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल ८० कोटी असल्याचे देखील सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या अनुषंगाने रोख रक्कम आणि अवैध मालमत्तेच्या वाहतुकीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मानखुर्द वाशी चेकपोस्टवर नाकाबंदी करण्यात आली होती. पोलिस प्रशासनाकडून वाहनांची तपासणी केली जात असताना, यावेळी एका ट्रकवर पोलिसांना संशय आला. याप्रकरणी आता पोलिसांकडून चाैकशीसाठी चालकाला ताब्यात घेण्यात आले. या घटनेची माहिती निवडणूक अधिकारी (Election Officer) आणि आयकर विभागाला लगेचच या घटनेची माहिती देण्यात आली.

(हेही वाचा – Israel च्या निशाण्यावर आता ‘हा’ मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू)

यापूर्वी विक्रोळीत घडली होती घटना…

दरम्यान, या पूर्वही मुंबई उपनगरातील विक्रोळी भागात एका कॅश व्हॅनमध्ये (Cash van) चांदीच्या विटा (Silver bricks) सापडल्या आहेत. विकोळी पोलिसांनी (Vikhroli Police) व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या या विटा एकूण साडेसहा टन इतकी असून, करोडोंच्या घरात यांची किंमत आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.