Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी जळगावात तणाव; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार

77
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी जळगावात तणाव; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीआधी जळगावात तणाव; अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांची सोमवारी, १८ नोव्हेंबर रोजी सांगता होणार आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. २० नोव्हेंबरला राज्यात मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला  लागणार आहे. त्यातच आता जळगावमधून (Jalgaon) धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Assembly Election 2024)

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहर मतदारसंघातील (Jalgaon City Constituency) अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसैन यांच्या घरावर अज्ञाताकडून सोमवारी, १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गोळीबार (Jalgaon firing) करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगलट; गुन्हा दखल)

तर पोलीस तपासादरम्यान रस्त्यावर तीन रिकामी काडतुसं आढळून आली. तसंच झडती दरम्यान खोलीत एक गोळी सापडली. या घटनेचा पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत. दरम्यान, अहमद हुसैन शेख (Ahmad Hussain Shaikh) पक्षाकडून त्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळं ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.