Assembly Election 2024 : लातूर जिल्ह्यात वंचित आघाडी आणि बंडखोरांवर प्रस्थापितांचे भविष्य अवलंबून राहणार

28
मुंबई प्रतिनिधी 
विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election 2024) उमेदवारांकडे अवघा पाच दिवसांचा अवधी राहिला असल्यामुळे उमेदवारांची प्रचारासाठी धावाधाव सुरु झाली आहे. जिल्ह्यातील सहा मतदारसंघामध्ये बहुतांश ठिकाणी दुरंगी लढती होण्याची शक्यता असल्या तरी वंचित बहुजन विकास आघाडी आणि बंडखोर उमेदवारांमुळे शेवटच्या टप्प्यात या लढतीचे रंगरुप पालटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत उमेदवार उभा करण्याची घोषणा करणार नसल्याचे सांगितल्यानंतर प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी निश्वास सोडला आहे. (Assembly Election 2024)
सुटकेचा निःश्वास सोडला

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरु केले होते. आरक्षणाचा निर्णय शेवटपर्यंत लागला नाही. तोपर्यंत निवडणुका जाहीर झाल्या. त्यामुळे मराठा आरक्षणातील सहभागी नेत्यांनी उमेदवार उभा करावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांच्याकडे केली होती. मात्र, त्यांच्या मागणीनंतर विचार करुन जरांगे यांनी उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला. जरांगे यांनी राजकीय भूमिका घेतली असती तर इतर मागासवर्गीय समाज आणि मराठ समाज असा मतसंघर्ष होऊन प्रस्थापित उमेदवारांना त्याचा फटका बसला असता अशी, चर्चा मतदारांमध्ये होत आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान संग्रहालयातून नेलेली नेहरूंची कागदपत्रे Sonia Gandhi आता जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडला देणार?)

अनेक ठिकाणी दुरंगी लढती पलटू शकतात
सध्या पहिल्या टप्प्यात प्रचारामध्ये प्रस्थापित उमेदवारांना प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. लातूर शहर आणि ग्रामीणमध्ये विद्यमान आमदारांना प्रतिसाद मिळत असला तरी दोन्ही ठिकाणी त्यांचे प्रतिस्पर्धी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांनी पहिल्या टप्प्यात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. लातूर ग्रामीणमधून आ. रमेश कराड (Ramesh Karad) हे भाजपाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या मतदारसंघात विकासकामांसाठी भरपूर निधी दिल्याचा दावा केला आहे. तसा दावा त्यांनी त्यांच्या प्रचार पत्रकांमधून मतदारांपर्यंत पोहचवला आहे. तर लातूर शहरमधून भाजपाकडून निवडणूक लढवत असलेल्या डॉ. अर्चना पाटील (Dr. Archana Patil) या माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा आहेत. त्यामुळे त्यांचा छुपा पाठिबा मिळण्याची शक्यता त्यांच्या कार्यकत्याकडून व्यक्त केली जात आहे. चाकूरकर यांना माणणारा वर्ग या मतदारसंघात बऱ्यापैकी आहे. औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर मतदारसंघामध्येही तुल्यबळ लढती आहेत. परंतू वंचित बहुजन विकास आघाडीमुळे (Vanchit Bahujan Vikas Aghadi) या लढती शेवटच्या टप्यात बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

उमेदवारांच्या पायाला भिंगरी

प्रचाराला जेमतेम पाच दिवस असल्याने उमेदवार पायाला भिंगरी लावल्यासारखे प्रचार करत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांची मनधरणी करुन मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांचे कुटूंबियही प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याचे चित्र लातूर जिल्ह्यात (Latur District) पहायला मिळत आहे.
लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांत १०६ उमेदवार रिंगणात

लातूर जिल्ह्यातील १०६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात लातूर ग्रामीण १८, लातूर शहर २३, अहमदपूर २०, उदगीर १३, निलंगा १३, औसा १९ असे एकूण १०६ निवडणुकीला सामोरे जात आहेत. सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात दोन बॅलेट युनिट लागणार आहेत, तर दोन विधानसभा मतदारसंघांत एक बॅलेट युनिट लागेल, अशी परिस्थिती आहे.  विधानसभेच्या या सार्वत्रिक निवडणुकीत सहा विधानसभा मतदारसंघात २ हजार १४३ मतदान केंद्र आहेत. त्यात लातूर ग्रामीण २६३, लातूर शहर ३८९, अहमदपूर ३७६, उदगीर ३५९, निलंगा ३४७ आणि औसा विधानसभा मतदारसंघात ३०९ मतदान केंद्रांवर मतदान होईल. या सहा विधानसभा मतदारसंघांत मिळून २० लाख ४५ हजार ५९१ मतदार आहेत. त्यात १० लाख ६५ हजार ११५ पुरुष, तर ९ लाख ७६ हजार ७६७ महिला मतदारांची संख्या आहे. तर तृतीयपंथी ६५ मतदार आहेत. दरम्यान, प्रशासनाकडून निवडणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

(हेही वाचा –Assembly Election 2024: निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; दुचाकीवरुन नेत होता दीड कोटी रुपये )

औसा विधानसभा मतदारसंघ 

प्रा.डॉ. अनिल कांबळे (बसपा), अभिमन्यू पवार (भाजपा), दिनकर माने (शिवसेना-उबाठा), शिवकुमार नागराळे (मनसे), अनिल जाधव (जलोपा), आकाश पुजारी (न्यू रासपा), ज्योतिराम शिंदे (निर्भय महाराष्ट्र पार्टी), नौशाद शेख (स्वराज्य शक्ती सेना), शाम गोरे (रासप), भाई शिवाजी सुरवसे (पीझन्टस् अॅण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया), उत्तम घोडके, दगडू माने, नरसिंग जाधव, नागनाथ मुगळे, नितीन पवार, मनोहर पाटील, राजेंद्र मोरे,शिवाजी कुंभार, हणमंत कारले (सर्व अपक्ष),

उदगीर विधानसभा मतदारसंघ (अ.जा.): 

दिपक सावंत (बसपा), सुधाकर संग्राम भालेराव (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), संजय बाबुराव बनसोडे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), भास्कर बंडेवार (बभापा), प्रा.डॉ. शिवाजी देवनाळे (वंचित बहुजन आघाडी), अजय कांबळे, गुरुदेव सूर्यवंशी, प्रभाकर कांबळे, बालाजी सूर्यवंशी, बालाजी कांबळे, बालाजी मोरे, अॅड. योगेश उदगीरकर, स्वप्नील जाधव (सर्व अपक्ष). निलंगा : अभय साळुंके (काँग्रेस), कांबळे ज्ञानेश्वर (बसपा), संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा), आकाश पाटील (रामपा), नागनाथ बोडके (रासपा), मंजू निंबाळकर (वंचित बहुजन आघाडी), हणमंत धनुरे (प्रहर जनशक्तीपक्ष), अन्वर हुसेन मैनोद्दीन सय्यद, दत्तात्रय भानुदास सूर्यवंशी, दत्तात्रय विश्वनाथ सूर्यवंशी, निळकंट बिरादार, फयाजमियाँ शेख, महेबूब पाशा खुर्शीद अहमद मुल्ला (सर्व अपक्ष),
लातूर शहर विधानसभा मतदारसंघ 

अमित देशमुख (काँग्रेस), डॉ. अर्चना पाटील चाकूरकर (भाजपा), सिध्दार्थ सूर्यवंशी (बसपा), अनिल गायकवाड (रिपाइं-ए), गौसोदिन शेख (स्वराज्य सेना पार्टी), घोणे नरसिंह (निर्भय महाराष्ट्र पार्टी), पंकज जैस्वाल (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमॉक्रॅटीक), भास्कर बंडेवार (बभापा), रावसाहेब करपे (रासपा), विनोद खटके (वंचित बहुजन आघाडी), सतीश करंडे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी),संतोष साबदे (जय हिंद जय भारत राष्ट्रीय पार्टी), अख्तरमिया शेख, आनंद लामतुरे, आश्विन नलबले, ईलाही शेख, नौशाद शेख, प्रविण माने, प्रसाद कोळी, बाबासाहेब सितापुरे, मंगेश ईळेकर, राजीव ऊर्फ राजकुमार पाटील, लक्ष्मीकांत जोगदंड (सर्व अपक्ष).

(हेही वाचा – Assembly Elections 2024 : नातूंवर टीका रामदास कदमांच्या मुलाला गुहागरमध्ये भोवणार?)

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
धिरज देशमुख (काँग्रेस), रमेश कराड (भाजपा), संतोष नागरगोजे (मनसे), डॉ. नितीन वाघे (संपूर्ण भारत क्रांती पार्टी), बालकिशन आडसूळ (रासपा), डॉ. अजनीकर विजय (वंचित बहुजन आघाडी), समाधान गोरे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमॉक्रॅटिक), समाधान शिंदे (महाराष्ट्र स्वराज्य पार्टी), अमन सुरवसे, गडगळे मारोती, झेटे सचिन, बावणे डॉ. दत्ता बावणे, दिपक इंगळे, नंदकिशोर साळुंके, पंकज देशमुख,बालाजी मोरे, लक्ष्मीकांत जोगदंड, सुमित्राबाई ऊर्फ स्वाती जाधव पाटील (सर्व अपक्ष).
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ 
अॅड. गायकवाड रमेश (बसपा), जाधव पाटील विनायकराव (नॅशनॅलिस्ट काँगेस पार्टी – शरदचंद्र पवार), डॉ. नरसिंह भिकाने (मनसे), बाबासाहेब पाटील (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), गणेश हाके (जन सुराज्य शक्ती), गिरजाप्पा बैकरे (महाराष्ट्र विकास आघाडी), जाधव विनायक (राष्ट्रीय मराठा पार्टी), धीरज कांबळे (सैनिक समाज पार्टी), अॅड. रियाज अहमद सिद्दीकी (जनहित लोकशाही पार्टी), वागलगावे रावसाहेब (बहुजन विकास आघाडी), उत्तम वाघ, अॅड. एकनाथ गजिले, कदम पुंडलीक, जाधव गणेश, दीपक कांबळे, बालाजी पाटील, महादेव भंडारे, माधव जाधव, विशाल बालकुंदे, संजीव चन्नागीरे (सर्व अपक्ष)
लातूर ग्रामीण मतदार संघातुन २०१९ च्या निवडणुकीत तगडा प्रतिस्पर्धी उमेदवार नसल्यामुळे सहज लाखांच्या फरकाने कॉंग्रेसचे धीरज देशमुख निवडूण आले होते. दुसऱ्या पसंदीचे २७५०० मतदान नोटा ला पडली होती म्हणजे त्यांचा सामना शिवसेनेनी दिलेल्या उमेदवाराऐवजी नोटाशी झाला होता. परंतु यावेळेस भाजपाने विधान परिषदेचे विद्यमान आमदार रमेश कराड यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्याने आणि मनसेनेही संतोष नागरगोजे सारखा लोकात मिसळणारा उमेदवार आणि वंचीतनेही तगडा उमेदवार दिल्याने गेल्या वेळेस नोटा विरोधात निवडून आलेले आ.धीरज देशमुख यावेळेसही निवडूण येतील काय ? आणि त्यातच गेल्या दोन वर्षांपासून राज्यात धुमसत असलेला मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कुणाला तारतो आणि कुणाला घरी बसवितो हे २३ तारखेला निकाला दिवशीच कळणार आहे.लातूर शहर विधानसभा निवडणूकीत यंदा माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ज्येष्ठ पूत्र अमित देशमुख आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांची सून डॉ.अर्चना पाटील यांच्या होणार आहे. सलग तीन वेळा निवडून आलेले अमित देशमुख आपला गड कायम राखतात की गमावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मतदार संघातील समस्या 
लातूरमध्ये पाण्याचा प्रश्न पाचवीला पूजलेला आहे. रस्ते, स्वच्छता, सांडपाण्याचा निचरा, कचऱ्याचे सर्वत्र पसलेले ढीग असे लातूर शहराचे चित्र कायम आहे. शहराची वाढ होत असताना आरोग्याच्या सुविधा आणि वाहतूक कोंडी आदी प्रश्न कायम आहेत. लातूर जिल्हा शासकीय रुग्णालयाला निधी मिळाला नसल्याने अमित देशमुख यांच्या विरोधात नाराजी आहे. येथील मुलभूत प्रश्न कायम असल्याने लातूरच्या निवडणूकीत यंदा भाजपाने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून डॉ.अर्चना पाटील यांना उतरवून निवडणूकीत रंगत आणली आहे.
उदगीर विधानसभा 

उदगीर मतदारसंघात झालेल्या भरीव विकास कामाचे श्रेय घेण्याची महाविकास आघाडीकडून धडपड सुरू झाली आहे. निवडणुकीत विकासाचे मुद्देच नसल्याने वातावरण थंडच आहे. प्रमुख विकास कामे झाल्यामुळे महायुती (Mahayuti) जोमात असून निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ही कामे माझ्या कार्यकाळात मंजूर झाल्याचा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार करत असल्याने विकासाच्या ठोस मुद्यापासून ही निवडणूक दूर जात असल्याचे दिसून येत आहे.

(हेही वाचा – बंद सम्राटाला कायमचे बंद करा; CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात)

लातूर ग्रामीण विधानसभा
लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीची हा जिल्हा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. या मतदारसंघात भाजपाचे रमेश कराड यांनी काँग्रेसचे धीरज देशमुख यांची लढत रंगतदार होणार आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघ

अहमदपूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी सामना होत आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. पक्ष फुटीनंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर यावेळी अजित पवार गटाकडून त्यांना पुन्हा उमेदनवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे  विनायकराव पाटील तर भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश हाके हे देकील निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघात रंगत वाढली आहे. काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला होता. मात्र, शरद पवार गटाला या मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे. त्यामुळं या मतदारसंघात शरदचंद्र पवार गट विरुद्ध अजित पवार असा सामना होत आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळं २३ तारखेलाच खरं चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.