- विशेष प्रतिनिधी, मुंबई
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेला मिळावी म्हणून प्रयत्न करत घोसाळकर कुटुंबाला कामाला लागण्याचे निर्देश देणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या वाट्याला हा मतदारसंघ न येता काँग्रेसच्या वाट्याला गेला. त्यामुळे घोसाळकर यांच्या कुटुंबाला उमेदवारी देता न आल्याने या कुटुंबाला दहिसरमधून उमेदवारी देण्यात येईल असे स्पष्ट असताना मात्र उबाठा शिवसेनेच्या पहिल्या ६५ जणांच्या यादीत दहिसरच्या जागेचा आणि उमेदवाराचा नावाचा सामावेशही नसल्याने दहिसरच्या जागेचा तिढा नक्की काय असा सवाल मतदारांना पडला आहे. (Assembly Election 2024)
दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने विद्यमान आमदार मनिषा चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे या मतदार संघातून घोसाळकर यांच्या कुटुंबातून कुणाला उमेदवारी मिळणार याबाबत अजुनही स्पष्टता नाही. पक्षाचे उपनेते व माजी आमदार विनोद घोसाळकर हे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार आहेत. तर माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येनंतर येथील सहानुभूतीच्या लाटेचा फायदा त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना होईल, याच विचाराने पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्याचा विचार सुरु आहे. त्यामुळे तेजस्वी घोसाळकर की विनोद घोसाळकर याबाबत अजुन्ही स्पष्टता न झाल्याने यांच्या उमेदवारीचा तिढा वाढल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसवर केली कुरघोडी)
उबाठा शिवसेनेला अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमुळे तेजस्वी घोसाळकर यांना पतीच्या निधनाची सहानभूती मिळेल असे सर्वेतून दिसून आल्याने पक्षाकडून तेजस्वीला उमेदवारी देण्यासाठी हट्ट केला जात आहे. तर तेजस्वीला राजकारणात अजुन एक टर्म महापालिकेचा अनुभव घेऊ द्यावा, तोपर्यंत मी ही निवडणूक लढवतो आणि पुढील वेळेस त्यांना याची उमेदवारी देता येईल असे विनोद घोसाळकर यांच्याकडून सांगितले जाते. त्यामुळे पक्षच सध्या बुचकाळ्यात पडला असून विनोद घोसाळकर की तेजस्वी असा पेच पक्षापुढे निर्माण झाला आहे. (Assembly Election 2024)
दरम्यान, तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून मतदारसंघात फिरुन एकप्रकारे प्रचाराचा भाग घेऊन फिरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता तेजस्वी घोसाळकर यांनी समाजमाध्यमावर आवाहन करत दहिसरमध्ये विकासाची मशाल नक्कीच पेटवणार तसेच समस्त घोसाळकर कुटुंबीय समर्पित भावनेने दहिसरकरांच्या सेवेसाठी एकजुटीने हजर असतल अशी ग्वाही त्यांनी दिली. दहिसरमधील उमेदवारीवरून आमच्या घरामध्ये मतभेद असल्याच्या खोट्या बातम्या पेरल्या जात आहे. घोसाळकर कुटुंबियांमध्ये फुट पाडण्याचा विरोधकांचा हा डाव आपण वेळीच ओळखला पाहिजे. मी प्रसारमाध्यमांना सांगू इच्छिते की उमेदवारीवरून आमच्यात कोणताही मतभेद न सून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्या निर्णयाला बांधील राहून आम्ही काम करू, असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community