Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे

113
Assembly Election 2024 : मातोश्री पुढे आता सिल्वर ओकचे वजन वाढत आहे
  • प्रतिनिधी

गेली पाच दशक महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता केंद्र म्हणून ओळखले जाणारे मातोश्री आता सिल्वर ओक समोर काहीसे खुजे होताना दिसून येत आहे. एकेकाळी सर्वच राजकीय पक्षांचे बडे नेते मग ते दिल्लीचे नेते असो किंवा राज्याचे हे मातोश्रीवर येत असत. परंतु आता याच मातोश्रीतील ठाकरे मात्र घराबाहेर पडले आहेत. सर्व बैठका यापूर्वी मातोश्रीवर होत असतात परंतु २०१९ नंतर उद्धव ठाकरे यांना मातोश्री बाहेर पडून सिल्वर ओकचे उंबरे झिजवावे लागत आहेत. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Rashmi Shukla Transfer : निवडणूक आयोगाविरोधात कांगावा करण्याची आता विरोधकांना संधी मिळणार नाही – माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित)

अविभक्त शिवसेना असताना मातोश्रीवर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचा राबता असायचा आता मात्र हा रस्ता पहावयास मिळत नाही. दस्तूर खुद्द उद्धव ठाकरेंनाच घराबाहेर पडावे लागत आहे आणि बैठकांसाठी सिल्वर ओक गाठावे लागत आहे. या परिस्थितीला काय म्हणावे ? याच मातोश्रीचा दरारा मोठा होता मातोश्री वरून आदेश आल्यानंतर तो मित्र पक्षांना देखील ऐकावा लागत असे. परंतु आता सर्व चित्र बदलले आहे मित्रपक्ष तर सोडाच स्व पक्षातली लोक देखील ऐकायला तयार नाहीत. ही परिस्थिती का ओढावली ? याचा सारासार विचार कधीतरी करावाच लागणार आहे. (Assembly Election 2024)

(हेही वाचा – Article 370 : पहिल्याच दिवशी Jammu and Kashmir विधानसभेत प्रचंड गदारोळ; जाणून घ्या कलम ३७० का ठरला चर्चेचा विषय?)

एका ओळीच्या आदेशावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देखील राजीनामे दिले आहेत. असे आदेश मातोश्री वरून निघायचे आणि त्याचे पालन करणारे शिवसैनिक देखील या राज्याने पाहिले आहेत. मित्र पक्षच नाही तर विरोधक देखील मातोश्री बद्दल बोलताना आदर राखूनच बोलत असायचे. परंतु आता हाल दरारा कुठेतरी कमी होताना दिसून येत आहे. २०१९ साली महाविकास आघाडी स्थापन झाली त्या सत्तेमध्ये शरद पवार आणि त्यांच्या सिल्वर ओकचे महत्व वाढत गेले. नंतरच्या काळात सर्वच बैठका या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा सिल्वर ओक या ठिकाणी होऊ लागल्या. सत्तेसाठी काही पण याच भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडावे लागले आणि दुसऱ्याच्या घराचे उंबरे झिजवावे लागत आहेत. (Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.