- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड या विराजमान झाल्यापासून त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या रवी राजा यांनी केल्यानंतरही त्यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली आहे. पाच वर्ष जो जनतेच्या सेवेत आहे, त्याला तिकीट नाकारले जाते आणि पाच वर्ष गायब होऊन निवडणुकीच्या वेळी प्रकट होणाऱ्या गणेश यादव यांना शीव कोळीवाडा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे नाराज झालेल्या मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी भाजपाची साथ पकडत काँग्रेसला राम राम केला. मात्र, काँग्रेस पक्ष सोडण्यामागे वर्षा गायकवाड याच जबाबदार असल्याने त्यांनी पक्ष सोडत भाजपात प्रवेश केला आणि भाजपाचे उमेदवार तमिल सेल्वन यांच्यासाठी सुरक्षित कवच निर्माण केले जाणार आहे. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : चांदिवली, कुर्ल्यात नावाशी साधर्म्य असणारे डमी उमेदवार)
शीव कोळीवाडा मतदारसंघातून यंदाच्या निवडणुकीत माजी विरोधी पक्षनेते रवी राजा हे प्रबळ उमेदवार असतानाही काँग्रेस पक्षाने गणेश यादव यांना उमेदवारी जाहीर केली. मागील निवडणुकीत काँग्रेसने रवी राजा यांचा पत्ता कापून गणेश यादव यांना दिली होती. परंतु यावेळेस उमेदवारी मिळण्याचा सर्व मार्ग खुला असतानाही पुन्हा रवी राजा यांचा पत्ता कापला गेला. त्यामुळे नाराज राजा हे भाजपाच्या तंबूत दाखल झाले. (Assembly Election 2024)
(हेही वाचा – Assembly Election वर सी व्हॉटर्सचा सर्व्हे; कोणाची चिंता वाढवली? )
मागील लोकसभा निवडणुकीत रवी राजा यांनी शीव कोळीवाडा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासाठी जीव तोडून काम केले. त्यामुळे शीव कोळीवाडा मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे अनिल देसाई यांना ७० हजार ९३१ मते मिळाली तर शिवसेनेच्या शेवाळेंना ६१ हजार ६१९ मतदान झाले होते.त्यामुळे महायुतीचे उमेदवार शेवाळे हे ९ हजार ३१३ मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्यानंतर यंदाचे वातावरण पुरक असतानाही मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड यांनी रवी राजा यांचा पत्ता कापून आपल्या मर्जीतील गणेश यादव यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ४४ वर्ष ज्या काँग्रेस पक्षात राहून संघटनात्मक काम केले, त्याच पक्षात किंमत न राहिल्याने आपली ताकद पक्षाला दाखवण्यासाठी राजा यांनी भाजपात प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. रवी राजा यांचे या मतदारसंघात चांगले वजन असल्याने याचा फायदा भाजपाचे उमेदवार तमिल सेल्वन यांना होऊ शकते असे बोलले जात आहे. वर्षा गायकवाड यांना पक्ष मजबूत करायचा नसून हाती अधिकार असल्याने आपल्याच मर्जीतील लोकांना पदे वाटून किंवा उमेदवारी देऊन इतरांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल जात असल्याचे स्थानिकांचेही म्हणणे आहे. (Assembly Election 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community