Assembly Election 2024 : राज्यात ६५.११ मतदान, ३० वर्षानंतर राज्यात मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद

46
Assembly Election 2024 : राज्यात ६५.११ मतदान, ३० वर्षानंतर राज्यात मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद
Assembly Election 2024 : राज्यात ६५.११ मतदान, ३० वर्षानंतर राज्यात मतदारांचा सर्वाधिक प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपैक्षा हा टक्का जास्त असल्याचे चित्र आहे. अखेरच्या काही तासांत मतदानाने (voting) जोर पकडल्याने राज्यात काही भागात वेगळे चित्र पाहायला मिळाले. (Assembly Election 2024 )

( हेही वाचा : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: “जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा…”, एक्झिट पोलच्या अंदाजांवर Devendra Fadnavis काय म्हणाले ?

निवडणुक आयोगाने रात्री ११. ४५ वाजता दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ६५.११ टक्के मतदान झाले आहे. त्यातही गेल्या वर्षात पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदानाची नोंद झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा ३.७ टक्के मतदान (voting) वाढलं आहे. मात्र मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरमध्ये मतदारांमध्ये मतदानाबाबत (voting) उदासीनता पाहायला मिळाली. (Assembly Election 2024 )

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या चार मोठ्या शहरांमध्ये मतदानाच्या प्रमाणात वाढ करण्यासाठी निवडणुक आयोगाने विशेष प्रयत्न केले. परंतु त्याला फारसे यश मिळाले नाही. राज्यात सर्वाधिक मतदान ८२ टक्के मतदान कोल्हापूरातील कागल विधानसभा मतदारसंघात झाले आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प)चे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प)चे समरजीत घाटगे (Raje Samarjeetsinh Ghatge) यांच्यात चुरशीची लढत आहे. तर कल्याण पश्चिममध्ये ४१ टक्के इतके सर्वात कमी मतदान झाले आहे. त्याशिवाय मंत्रालय, विधानसभा ही सत्तेची केंद्रे असलेल्या कुलाबा मतदारसंघात ४५ टक्के इतके मतदान झाले आहे. (Assembly Election 2024 )

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.