Assembly Election : अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातून ७० उमेदवार रिंगणात

99
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचे तापले आहे. अकोला जिल्ह्यातही हालचालींना वेग आला आहे. जाणून घेऊयात अकोला जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती.

१५ ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या घोषणेनंतर महाराष्ट्रातील राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. त्यामुळे कोणता मतदारसंघ कोणाच्या वाट्याला ?, कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असणार आहे ?, याबाबत उमेदवार आणि जनतेमध्ये मोठा संभ्रम पाहायला मिळतो आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Indian Railway: भारतीय रेल्वेचे नवीन अॅप लाँच, तिकीट ते जेवण सर्व एका क्लिकवर!)

अकोला जिल्ह्याच्या राजकारणातही सध्या अशीच संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एकूण पाच मतदारसंघ आहेत. यातील चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. तर एक मतदारसंघ शिवसेना उबाठाच्या ताब्यात आहे.

अकोला जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून सध्या उमेदवारी दिल्यामुळे येथील निवडणूक ही काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी देखील होऊ शकते. लोकसभेत भाजपाच्या विजयानंतर अकोला जिल्ह्यात भाजपाच्या उत्साहात मोठी भर पडली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भाजपाला अकोट मुर्तिजापूर आणि अकोला पश्चिम मतदारसंघात आमदार विरोधी लाटेला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.‌ जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कशी राजकीय परिस्थिती आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – UBT Manifesto : उबाठा गटाचा वचननामा जाहीर; अनेक सोयी मोफत देण्याचे गाजर)

२०१९ मधील विधानसभेतील पक्षीय बलाबल

एकूण विधानसभा मतदारसंघ : ५

भाजपा : ४
शिवसेना : १

राजकीय उलथापालथीनंतर अकोला जिल्ह्यातील विधानसभेचे सध्याचे राजकीय बलाबल

भाजपा : ४
शिवसेना (उबाठा) : १

1) अकोला पश्चिम : गोवर्धन शर्मा (निधन) : भाजपा
2) अकोला पूर्व : रणधीर सावरकर : भाजपा
3) अकोट : प्रकाश भारसाकळे : भाजपा
4) मुर्तिजापूर (राखीव : एससी) : हरिश पिंपळे : भाजपा
5) बाळापूर : नितीन देशमुख : शिवसेना उबाठा 

अकोला पश्चिम :

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या मुख्यालयाचा मतदारसंघ आहे. पूर्णतः शहरी असलेल्या या मतदारसंघात ३ लाख ४९ हजार ४८४ मतदार आहे. गेल्या तीस वर्षांत अनेक राजकीय लाटा आणि वादळे आलीत. पण, या मतदारसंघावरील भाजपाची पकड ना ढिली झाली ना खिळखिळी. तर प्रत्येक निवडणुकीत भाजपाचे ‘कमळ’ येथे मोठ्या दिमाखात आणि ताकदीने उमलत गेले. याआधी या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझहर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं आहे. भाजपाच्या या मतदारसंघातील ताकदीचे मर्म लपलेले आहे ते मजबूत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे. याच बळावर गोवर्धन शर्मा यांनी सलग सहावेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केले आहे. (Assembly Election)

१९९५ पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. मात्र, काँग्रेसच्या या गडाला अंतर्गत मतभेदांचा विळखा पडला आणि हा मतदारसंघ अलगदच भाजपाच्या ताब्यात गेलाय. संपूर्णतः शहरी असलेला हा मतदारसंघ आहे. अकोला महापालिकेच्या २० पैकी १२ प्रभागांचा या मतदारसंघात समावेश आहे. लोकसभेत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांना १२ हजार मतांची आघाडी मिळाली होती. तीस वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात आघाडी मिळाल्याने महाविकास आघाडीने या मतदारसंघावर आपले लक्ष चांगलेच केंद्रित केले आहे.

(हेही वाचा – शेकडो वर्षे जुन्या कानिफनाथ मंदिरावरही Waqf Board चा दावा)

अकोला पश्चिम मतदारसंघात २०१९ मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते :

भाजपाचे गोवर्धन शर्मा २५९३ मतांनी विजयी

गोवर्धन शर्मा – भाजपा – ७३२६२
साजिद खान पठाण – काँग्रेस – ७०६६९
मदन भरगड – वंचित – २०६८७

अकोला पश्चिम मतदारसंघातील मतदारसंख्या :

स्त्री : १७५३२२
पुरुष : १७४१३८
तृतीयपंथी : २४
एकूण : ३४९४८४

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आणि सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाल सुरु झाली. २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे आणि निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर केले जातील. महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा जागा आहेत आणि १४५ जागांवर विजय मिळवणारा पक्ष किंवा आघाडी सरकार स्थापनेचा दावा करू शकेल. अकोला पश्चिम ही महाराष्ट्रातील महत्त्वाची विधानसभा जागा आहे. अकोला जिल्ह्यातील ही जागा राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. (Assembly Election)

(हेही वाचा – शरद पवारांबाबातच्या वक्तव्यानंतर Sadabhau Khot यांची जाहीर माफी)

अकोला पश्चिम विधानसभा :

अकोला पश्चिम विधानसभा २००८ च्या परिसीमनानंतर अस्तित्वात आली होती. या जागेवर भाजपाने कायमच वर्चस्व राखले आहे. भाजपाचे नेते गोवर्धन शर्मा या जागेवर तीन वेळा निवडणूक जिंकले होते. गोवर्धन शर्मा हे महाराष्ट्रातील भाजपाचा एक मोठा चेहरा होते. परंतु, नोव्हेंबर २०२३ मध्ये गोवर्धन शर्मा यांचे निधन झाले. त्यामुळे या निवडणुकीत अकोला पश्चिम सीटवर एक नवा चेहरा आणि नव्या राजकीय समीकरणांचा सामना होईल.

२०१९ विधानसभा निवडणुकीतील निकाल :

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत गोवर्धन शर्मा यांना भाजपाकडून पुन्हा तिकीट मिळाले होते. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून साजिद पठान होते, जे एक मुस्लिम चेहरा होते. याव्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडीकडून मदन भारगड हेही उभे होते. तरीही गोवर्धन शर्मा यांनी ७३,२६२ मतांनी विजय मिळवला. काँग्रेसचे साजिद पठान यांना ७०,६६९ मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीच्या मदन भारगड यांना २०,६८७ मते मिळाली होती. गोवर्धन शर्मा यांना साजिद पठान वर २,५९३ मतांनी मात केली होती.

राजकीय ताणतणाव :

अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रातील जातिगत समीकरणे फारसे महत्त्वाचे नाहीत. या क्षेत्रात मुस्लिम समुदायाचा मोठा प्रभाव आहे आणि एकूण मतदारांपैकी सुमारे ४१ टक्के मतदार मुस्लिम आहेत. उर्वरित समाजाचे प्रतिनिधित्व कमी प्रमाणात आहे. यामुळे या क्षेत्रात मुस्लिम मतदारांचा प्रभाव महत्त्वपूर्ण ठरतो.

अकोला पश्चिम विधानसभा या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पातळीवर मोठे बदल आणि चढाओढ दिसून येईल. गोवर्धन शर्मा यांच्या निधनानंतर, या सीटवर कोण बाजी मारतो, हे आगामी निवडणुकीचे निकालच ठरवतील. (Assembly Election)

(हेही वाचा – Jammu & Kashmir : कलम ३७० वरुन जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा राडा!)

अकोला पूर्व : 

अकोला जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व मतदारसंघ. शहरी आणि ग्रामीण तोंडवळा असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अकोला महापालिकेचे ८ प्रभागासोबतच अकोला तालुक्याचा ग्रामीण भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. तर महाविकास आघाडीत या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि उबाठामध्ये रस्सीखेच सुरु होती.

अकोला पूर्व मतदारसंघात २०१९ मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते

भाजपाचे रणधीर सावरकर २४,७२३ मतांनी विजयी

रणधीर सावरकर – भाजपा – १००४७५
हरिदास भदे – वंचित – ७५७५२
विवेक पारसकर – काँग्रेस – ९५३३

अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारसंख्या :

स्त्री : १७३५१०
पुरुष : १८०१६५
तृतीयपंथी : १५
एकूण : ३५३६९०

या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ३ लाख ५३ हजार ६९० इतकी आहे. २०१४ मध्ये युतीत सेनेच्या ताब्यातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपाचे कमळ फुलले. गेल्या दहा वर्षांत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघावर चांगलीच पकड बसवलीय. जिल्ह्याच्या राजकारणात धोत्रे गटाचे ‘चाणक्य’ म्हणून जिल्ह्यात रणधीर सावरकर यांची ओळख आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघात भाजपाला २७ हजार मतांची आघाडी मिळाली होती. या निवडणुकीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, खारपाणपट्ट्याचा प्रश्न, त्याबरोबरच मोठे उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी हे प्रश्न गाजण्याची शक्यता आहे. सध्या जिल्हा आणि भाजपाच्या राजकारणावर आमदार रणधीर सावरकर यांची मोठी पकड आहे. त्यामुळे आमदार सावरकर यांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे विरोधक या मतदारसंघात मोठी ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अकोला पूर्व मतदासंघातील निवडणूक निश्चितच ‘हाय व्होल्टेज’ असेल यात शंका नाही. (Assembly Election)

(हेही वाचा – लोक जमिनी विकून, नोकऱ्या सोडून तयार झाले होते; मनोज जरांगेंच्या निर्णयावर Rajaratna Ambedkar नाराज)

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला. अपवाद वगळता तेव्हापासून हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आहे. भाजपाचे रणधीर सावरकर हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. २००९ मध्ये भारिप बहुजन महासंघानेही या मतदारसंघातून विजय मिळवला होता. या मतदारसंघात दलित मते निर्णायक आहेत. त्याचाच भारिप बहुजन महासंघाला फायदा मिळाला होता.

२०१९ च्या निवडणुकीत अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे रणधीर सावरकर उभे होतो. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे हरिदास भदे तर काँग्रेसकडून विवेक पारस्कर उभे होते. ही निवडणूक एकतर्फी झाली. रणधीर सावरकर यांना १००,४७५ मते मिळाली. तर वंचितच्या हरिदास भदे यांना ७५,७५२ मते मिळाली. काँग्रेसचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर गेला. काँग्रेसच्या विवेक पारस्कर यांना एकूण ९,५३४ मते मिळाली होती.

अकोट : 

अकोट विधानसभा मतदारसंघ हा अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ. या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतो. या मतदारसंघात तब्बल ३ लाख १० हजार ८८ मतदार आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका ‘खास’ वैशिष्ट्यासाठी ओळखला जातो. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला ‘आमदार’ परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघाने १९८५ पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीने पाळला आहे. मात्र, २०१४ आणि २०१९ असे सलग दोनदा भाजपाचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. २०१४ पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. २००९ मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र, २०१४ मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात गेला. (Assembly Election)

या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहे. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेत. लोकसभेत येथून भाजपाला ९१६८ हजार मतांची आघाडी आहे.

अकोट मतदारसंघात २०१९ मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते

भाजपाचे प्रकाश भारसाकळे ७,२६० मतांनी विजयी

प्रकाश भारसाकळे – भाजपा – ४८५८६
संतोष रहाटे – वंचित – ४१३२६
अनिल गावंडे – अपक्ष – २८१८३

(हेही वाचा – BMC : प्रत्येक वॉर्डला स्वतंत्र शहर गृहित धरुन शहराच्या विकासाचे नियोजन करा, आयुक्तांचे विभागाला निर्देश)

अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या :

स्त्री : १४९२१४
पुरुष : १६०८७३
तृतीयपंथी :१
एकूण : ३१००८८

येथील स्थानिक आमदाराच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपाच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा ‘रेड झोन’मध्ये असल्याचे सांगितले जात आहे.

भाजपाच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली.‌ तर शिंदे यांच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला होता. (Assembly Election)

हा मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर असलेला आहे. या मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाही आहे. अकोट विधानसभा मतदारसंघ अकोला जिल्ह्यात स्थित आहे आणि इथे मुस्लिम समाज मोठ्या संख्येने आहे. अकोट विधानसभा क्षेत्रात मुस्लिम मतदारांचा अंदाजे २६ टक्के वाटा आहे. उर्वरित समाजातील लोकांची संख्या २ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे, ज्यात वानखेडे, तायडे, इंगले, राउत इत्यादी जातींचा समावेश आहे. यामुळे, जातीय आणि धार्मिक समीकरणांची भूमिका आकोट विधानसभा क्षेत्रात महत्त्वाची ठरते. अकोट विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सध्या बदलत असलेली राजकीय परिस्थिती लक्षात घेतल्यास, आगामी निवडणुकीत कशा प्रकारच्या बदलांची शक्यता आहे, यावर चर्चा होऊ शकते.

(हेही वाचा – मविआच्या अधिकृत उमेदवाराविरोधात कुठेही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही; Ramesh Chennithala यांचा मित्रपक्षांना इशारा)

मुर्तिजापूर : (राखीव : अनुसूचित जाती)

अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव मतदारसंघ म्हणजे मुर्तिजापूर. मुर्तिजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ. कधीकाळी काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नव्हता असे बोलले जायचे. मात्र, १९९० च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’ आणि भाजपाचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला. अन् काँग्रेसही येथून हद्दपार झालीय. आणि १९९५ पासून २००४ चा अपवाद वगळता भाजपाने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवलाय. विशेष म्हणजे भाजपाला भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीतील मतविभाजनाच्या जोरावरच येथे ताकद वाढवता आली आहे. २००९ पासून गेल्या तीन निवडणुकांत भाजपाचे हरीश पिंपळे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, सध्या आमदार पिंपळे यांना मोठ्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

मुर्तिजापूर मतदारसंघात २०१९ मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते

भाजपाचे हरीश पिंपळे १,९१० मतांनी विजयी

प्रतिभा अवचार – वंचित – ५७६१७
रविकुमार राठी – राष्ट्रवादी – ४११५५

मुर्तिजापूर मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या :

स्त्री : १५११२१
पुरुष : १५८६२९
तृतीयपंथी : ५
एकूण : ३०९७५५

(हेही वाचा – Naresh Mhaske यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – एकनाथ शिंदे निवडणुक… )

बाळापूर :

विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर म्हणजे बाळापूर. कधीकाळी मुघलांची या भागातील राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर. त्यामुळेच आजही अकोला जिल्ह्याची बरेच ठिकाणी ओळख ही ‘बाळापुर-अकोला’ अशी आहे. ऐतिहासिक वारशांनी समृद्ध असलेल्या बाळापूर विधानसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहासही काहीसा वेगळा वाटला जाणारा. अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ. कारण गेल्या ३० वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिले. या निवडणुकीत बाळापुरात ३ लाख ९ हजार १२७ मतदार आहेत.

बाळापूर मतदारसंघात २०१९ मध्ये प्रमुख तीन उमेदवारांना मिळालेली मते :

शिवसेनेचे (उबाठा) नितीन देशमुख १८,७८८ मतांनी विजयी

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर – वंचित – ५०५५५
डॉ. रहेमान खान – एमआयएम – ४४५०७

बाळापूर मतदारसंघातील मतदारसंख्या :

स्त्री : १५०१९९
पुरुष : १५८९२६
तृतीयपंथी : २
एकूण : ३०९१२७

या मतदारसंघात उबाठा गट, वंचित आणि भाजपाचे मोठे संघटनात्मक जाळे आहे. मतदारसंघातील बाळापूर आणि पातूर नगरपालिकांवर काँग्रेसची सत्ता होती. तर बाळापूर, पातूर पंचायत समित्या वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत. शिवसेना उबाठा आणि वंचितने मागील वर्षभरात या मतदारसंघात ताकदीने पक्षसंघटन बांधले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या अनुप धोत्रेंना या मतदारसंघात ९ हजार ८४४ मतांची पिछाडी मिळाली होती. बाळापुरातील लढत हा राज्यभरासाठी ‘हाय होस्टेल ड्रामा’ असणार आहे. कारण, गुवाहाटीवरून परत आल्यानंतर आमदार नितीन देशमुखांनी सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने गंभीर आरोप केलेत. त्यामुळे ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराला पराभूत करण्यासाठी महायुती बाळापुरात मोठी ताकद लावणार आहे. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.