- विशेष प्रतिनिधी, मुंबई
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज भरण्याचा पाचवा दिवस उजाडला तरी महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा आणि त्या जागेवर उमेदवार अद्याप ठरवता येत नाही. मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्रात महायुती आणि महाविकास आघडीला केवळ ६० टक्केच जागांवर उमेदवार निश्चित करून जाहीर करता आलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात उमेदवार कधी जाहीर होणार आणि कधी उमेदवारी अर्ज भरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Assembly Election)
(हेही वाचा – CM Yogi Adityanath: सणासुदीच्या काळात वीज, गॅसबाबत योगी सरकारने केली मोठी घोषणा!)
शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे महायुती तसे उबाठा शिवसेना, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाचा तिढा तुटत असल्याचे जाहीर केले जात असून इतर पक्षात सरासरी ४५ ते ५० उमेदवारांच्या उमेदवारी जाहीर केले आहेत. मात्र उमेदवारी अर्ज सुरुवात पाचवा दिवस उजाडत गेली महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवारांच्या नावांची अद्याप करण्यात यश येत नाही. (Assembly Election)
(हेही वाचा – Shivendra Raje Bhosale यांचे टिकास्त्र, शरद पवारांमुळे मराठा आरक्षण प्रश्न चिघळला)
आतापर्यंत महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेच्या वतीने ६५ उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसच्या वतीने ४८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यावतीने ४५ अशा प्रकारची यादी जाहीर करण्यात आली. तर महायुतीतील भाजपाकडून पहिली ९० उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे तर शिवसेनेकडून ४५ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली आणि दुसरी अशा प्रकारे ४५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र मुंबईतील ३६ जागांच्या उमेदवारीचा आढावा घेतल्यास महाविकास आघाडीला मुंबईमध्ये ३६ पैकी १७ जागांवर उमेदवार जाहीर करता आले नाही, तर महायुतीला १६ जागांवर उमेदवार देता आले आहेत तर मनसे कडून मुंबईमध्ये १७ जागांवर उमेदवारांची नावे अद्याप जाहीर करता आलेली नाहीत. (Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community