Assembly Election : सिंधुदुर्गात दीपक केसरकर, नितेश राणे, निलेश राणे, वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला

92
Assembly Election : सिंधुदुर्गात दीपक केसरकर, नितेश राणे, निलेश राणे, वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला
  • सचिन धानजी, मुंबई

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ आणि देवगड वैभववाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ येत असून या सर्व मतदारसंघात यंदा मात्र मोठी उलथापालथ आहे. या तिन्ही मतदारसंघात शिक्षण मंत्री दीपक केसरकर, नितेश राणे, वैभव नाईक यांच्यासह राजन तेली, राजन पारकर ही मंडळी निवडणूक रिंगणात आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदारसंघात कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात खासदार नारायण राणे यांना मताधिक्य मिळाल्याने लोकसभेची स्थिती कायम राहते की बदलते याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – महायुतीची प्रतिमा मलिन करणार्‍या आठ पदाधिकाऱ्यांचे निलंबन; Sunil Tatkare यांची घोषणा)

कुडाळमध्ये नारायण राणेंच्या त्या पराभवाचा बदला युती घेणार का?

कुडाळ विधानसभा मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे वैभव नाईक आणि शिवसेनेचे निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत आहे. कुडाळ विधानसभा मतदारसंघात मागील अनेक वर्षांपासून निलेश राणे हे प्रयत्न करत असून हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्याने भाजपाचे खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांना शिवसेनेत प्रवेश देऊन त्यांना ही पक्षाच्यावतीने उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात उबाठा शिवसेनेचे वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव करून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आणला होता. परंतु, यावेळी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी राणेंकडे असून निलेश राणे हे वैभव नाईकला पाणी पाजतात का याकडे सर्वांचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांना कुडाळ विधानसभेतच सर्वांधिक मते मिळाली आहे, त्याचा फायदा राणेंना होऊ शकते आणि नारायण राणे यांच्या पराभवाचा उट्टे काढण्याची संधी निलेश राणे आणि शिवसेना भाजपा युतीसमोर आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Poll : सांगलीत अलिबाग पॅटर्न!)

कणकवली नितेश राणेंसमोर संदेश पारकरांचे आव्हान ठरेल का?

कणकवली, वैभववाडी विधानसभा मतदारसंघात विद्यमान भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यासमोर मगील, संदेश पारकर यांच्यातच प्रमुख लढत आहे. सन २०१४मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या नितेश राणे यांनी सन २०१९मध्ये भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवल्यानंतर याला शिवसेनेने विरोध करत सतीश सावंत यांनी त्यांच्याविरोधात उभे केले. परंत शिवसेनेचे आव्हान असतानाही नितेश राणे हे ८४ हजार मते मिळवत विजयी झाले. तर शिवसेनेच्या सतीश सावंत यांना ५६ हजार मतदान झाले होते. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेने नितेश राणे यांच्या विरोधात संदेश पारकर यांना उभे केले आहे. संदेश पारकर यांचे आव्हान निर्माण केले असले तरी संदेश पारकर यांचा मागील काही वर्षांपासून कणकवलीचा संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासमोर पारकर यांचे आव्हान किती असेल असा प्रश्न उपस्थित असेल. (Assembly Election)

(हेही वाचा – Mumbai Crime : चेंडूंमधून सोन्याची तस्करी, इलेक्ट्रिशियन ताब्यात)

सावंतवाडीत केसरकरांपुढे राजन तेली आणि विशाल परबांचे आव्हान

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विद्यमान शिवसेना आमदार आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपाचेच आव्हान निर्माण झाले आहे. मागील निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढणारे राजन तेली यांनी केसरकर यांना शह देण्यासाठी भाजपाला सोडचिठ्ठी देत उबाठा शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडून राजन तेली मशाल चिन्हावर निवडणूक लढवत असून ही जागा न मिळाल्याने भाजपाचे पदाधिकारी असलेल्या विशाल परब यांनीही बंडेखारी करत केसरकर यांच्या विरोधात बंड केला आहे. त्यामुळे सावंतवाडी मतदारसंघातील तेल लावलेला पहेलवान म्हणून ओळखला जाणाऱ्या केसरकर यांच्यासमोर उबाठा शिवसेनेचे राजन तेली आणि भाजपाचे बंडखोर विशाल परब यांचे आव्हान असल्याने यंदा या चक्रव्युहातून केसरकर कसा विजयाचा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.