आगामी Assembly Election ची जोरदार तयारी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुंबईच्या बांधणीसाठी रस्त्यावर

197
आगामी Assembly Election ची जोरदार तयारी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे मुंबईच्या बांधणीसाठी रस्त्यावर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर आता मुंबईची जबाबदारी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून रविवारपासून श्रीकांत शिंदे यांनी दक्षिण, दक्षिण मध्य आणि उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईतील विधानसभा क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेतला आहे. शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी डॉ. शिंदे हे संवाद साधत प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे मनोधर्य वाढवण्यासाठी आगामी निवडणुकीसाठी मोठ्या ताकदीने कामाला लागा असे आवाहनही त्यांच्यकडून केले जात असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील विधानसभा (Assembly Election) क्षेत्रांचा आढावा आणि संवाद सध्या शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून घेतला जात आहे. श्रीकांत शिंदे यांनी प्रथम शुक्रवारी २० सप्टेंबर २०२४ रोजी मागाठणे व मालाड पश्चिम या विधानसभांचा आणि त्याच दिवशी दुपारनंतर जोगेश्वरी, दिंडोशी व अंधेरी पूर्व या विधानसभांचा आढावा घेतला. आणि दरविवारी २२ सप्टेंबर रोजी दक्षिण मुंबईतील भायखळा, शिवडी व वरळी विधानसभांमधील पदाधिकारी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधला. तर त्याच दिवशी सायंकाळी ईशान्य मुंबईतील भांडुप पश्चिम आणि विक्रोळी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

(हेही वाचा – Cabinet Meeting : पुणे ते संभाजीनगरचा प्रवास सुसाट; १४ हजार ८८६ कोटींच्या ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाला मंजुरी)

तर सोमवारी सकाळी उत्तर मध्य मुंबईतील चांदिवली, वांद्रे पूर्व, कलीना आणि कुर्ला या चार विधानसभांचा आढावा वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्लब आणि चेंबूर पश्चिम येथील युटोपिया बॅक्वेट हॉलमध्ये घेतला. तर सायंकाळी दक्षिण मध्य मुंबईतील अणुशक्ती नगर व चेबूर विधानसभांचाही आढावा घेतला, त्यानंतर माहिम आणि धारावी विधानसभांचाही आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हा जनसंवादाचा तिसरा टप्पा असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर या बैठका घेतल्या जात आहे. मुंबईतील या सर्व आढावा बैठकांचे समन्वय माजी नगरसेवक अमेय घोले हे करत असून या बैठकीला माजी खासदार, आमदार, माजी नगरसेवक, पक्षाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख आदी महिला व पुरुष महिला पदाधिकारी उपस्थित होते.

या सर्व विधानसभा (Assembly Election) क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांशी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतानाच त्या सर्व समस्या तात्काळ निवारण करण्यावर भर दिला. तसेच या समस्या तात्काळ सुटल्या गेल्याने पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून समाधान व्यक्त केले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याच पदाधिकाऱ्यांकडून विभागातील समस्या नोंद करून घेत त्या सोडवण्याचा प्रयत्न झाल्याने एकप्रकारे पदाधिकाऱ्यांनाही या धडक कार्यवाहीचे स्वागत होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून ही बैठका महत्वाची आणि पदाधिकाऱ्यांचे मनोबल उंचावणारा ठरत आहे. या सर्व समस्या तात्काळ सोडवणे शक्य नाही त्याची नोंद घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या १८ विधानसभा क्षेत्रांचा आढावा घेतला जात असला तरी शिवसेना पक्षाची ताकद अधिक वाढवण्याच्यादृष्टीकोनातून या आढावा बैठका घेतला जात असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना सांगितले. कोणत्याही लढवायच्या याचा निर्णय पक्षाचे मुख्य नेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र बैठक घेऊन ठरवील. त्यामुळे महायुतीची ताकद या माध्यमातून वाढवण्याचा प्रयत्न यामाध्यमातून होत असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

(हेही वाचा – Israel and Hezbollah Conflict : इस्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला; 100 लोकं ठार, 300 हून अधिक जखमी)

कोणत्या विधानसभांचा आढावा घेतला आहे
  • मागाठाणे विधानसभा
  • मालाड पश्चिम विधानसभा
  • जोगेश्वरी विधानसभा
  • दिंडोशी विधानसभा
  • अंधेरी पूर्व विधानसभा
  • भायखळा विधानसभा
  • शिवडी विधानसभा
  • वरळी विधानसभा
  • भांडुप पश्चिम विधानसभा
  • विक्रोळी विधानसभा
  • चांदिवली विधानसभा
  • वांद्रे पूर्व विधानसभा
  • कलीना विधानसभा
  • कुर्ला विधानसभा
  • अणुशक्ती नगर विधानसभा
  • चेंबूर विधानसभा

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.