- प्रतिनिधी
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला ८५ च्या खोड्यात अडकवण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला. पण दोन दिवस त्या बातम्या चालल्यानंतर देखील तो यशस्वी होऊ शकला नाही. काँग्रेसने अखेर १०० गाठलीच. काँग्रेसने ८७ जागांवरचे उमेदवार जाहीर केले होते. उरलेले १४ उमेदवार संध्याकाळपर्यंत जाहीर करू, असे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले होते. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी देखील दुजोरा दिला होता. त्यानुसार काँग्रेसने काल रात्री उशिरा १४ उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर करून काँग्रेसने महाविकास आघाडीत ठाकरे आणि पवारांच्या पक्षांवर कुरघोडी केली. (Assembly Election)
(हेही वाचा – BJP तिसरी यादी जाहीर; वर्सोवातून भारती लव्हेकर, बोरिवलीतून संजय उपाध्याय यांना उमेदवारी)
किती जागांवर अडकले घोडे
५३ महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गट नामनिर्देशित उमेदवार तीन याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यामध्ये एकूण ८४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसने चार यादीत एकूण १०१ उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवार यांच्या पक्षाने तीन यादीत ७६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. तिन्ही पक्षांनी एकूण २६१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. सध्या २७ जागांवर पेच आहे. काही ठिकाणी मित्रपक्षांमध्ये मतभेद दिसून येत आहेत. काही जागांवर एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणूक लढवल्याने पक्षाला निकालापर्यंत पोहोचता आलेले नाही. काही जागांवर दोन पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. सपा राज्यात पाच जागांची मागणी करत आहे. (Assembly Election)
(हेही वाचा – उत्तर प्रदेशातही BJP चा हरियाणा फॉर्म्युला)
महाविकास आघाडीचे घोडे कोणत्या जागेवर अडले
सिंदखेडा, शिरपूर, अकोला पश्चिम, दर्यापूर, वरुड-मोर्शी, पुसद, पैठण, बोरिवली, मुलुंड, मलबार हिल, कुलाबा, खेड आळंदी, दौंड, मावळ, कोथरूड, औसा, उमरगा, माढा, वाई, माण, सातारा, मिरज, खानापूर सारख्या जागांची नावे समाविष्ट आहेत. याशिवाय भिवंडी पूर्व, मानखुर्द शिवाजीनगर, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, कळवण, डहाणू या जागा मित्रपक्षांना देण्याबाबत अंतिम निर्णय होणे बाकी आहे. (Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community