Assembly Election : महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

227
Maharashtra Assembly Election : राज्यात ९.७ कोटी मतदार; कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक मतदार संख्या?
  • प्रतिनिधी 

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची (Assembly Election) घोषणा मंगळवारी (१५ ऑक्टोबर) निवडणूक आयोगाने केली. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणे आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणे आहे. पहिल्या टप्प्याची निवडणूक 13 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी विज्ञान भवनात पत्रकारांना संबोधित करताना महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात 288 तर झारखंडमधील 81 जागांसाठी निवडणूक होणे आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election मध्ये ४ कोटी ६६ लाख महिला मतदारांची मते ठरणार निर्णायक)

राजीवकुमार यांनी 48 विधानसभा (Assembly Election)आणि दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेडमध्ये सुद्धा 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. तर राहुल गांधी यांनी वायनाडच्या खादारकीचा राजीनामा दिल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.

महाराष्ट्रात एकूण 288 जागा असून सामान्य वर्गातील 234 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 29 आणि अनुसूचित जनजातीसाठी 25 जागा राखीव आहेत. झारखंडमधील 81 पैकी एसटीसाठी 28 तर एससीसाठी 9 जागा राखीव आहेत. महाराष्ट्रात एक लाख 186 पोलिंग बूथ राहणार आहेत. यातील 42604 शहरी भागात आहेत. (Assembly Election)

(हेही वाचा – Election Commission : निवडणूक आयोगाकडून ‘ईव्हीएम’बाबत मोठा खुलासा)

एकूण पोलिंग स्टेशन

एकूण मतदार : 9.63 कोटी

पुरुष : 4.97 कोटी

महिला : 4.66 कोटी

तृतीय पंथी : 100 च्या वर

प्रथम मतदार : 20.93 लाख

20 ते 29 वयोगटातील : 1.85 कोटी

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. यापूर्वी हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झाली तेव्हा महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली नव्हती. पावसाळा, गणेशोत्सव, पितृ पक्ष, नवरात्र आणि दिवाळी या कारणांमुळे जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राच्या निवडणुका घेणं शक्य नव्हते असे राजीवकुमार म्हणाले होते. तसेच यावेळी सर्वच बूथवर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. शिवाय ज्येष्ठ व्यक्तींना घऊन मतदान करता येईल. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.