Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; ‘एक है तो सेफ है’ ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का

100
Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; 'एक है तो सेफ है' ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघापैंकी तब्बल ०९ विधानसभा मतदारसंघ हे मुस्लिमबहुल वस्त्यांचे असून दहा मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मुस्लिमांचा फतवा काही चाललेला दिसून आला नाही. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार मोठ्याप्रमाणात रस्त्यावर उतरले नसून लोकसभेला मोठ्याप्रमाणात मुस्लिम मतदार बाहेर पडल्याने त्याला शह देण्यासाठी हिंदू मतदार रस्त्यावर उतरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुस्लिमबहुल मतदारसंघातील मतदानाचा टक्का कमी झाला असला तरी हिंदू वस्त्यांमधील मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढलेला दिसून येत आहे. ‘एक है तो सेफ है’ च्या नाऱ्याने हिंदूंच्या मतांचा टक्का अधिक वाढल्याचे बोलले जात आहे. (Assembly Election)

मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैंकी भायखळा, मुंबादेवी, धारावी, मालाड, चांदिवली, अणुशक्ती नगर, मानखुर्द शिवाजीनगर, कुर्ला, वांद्रे पूर्व आणि कलिना या दहा विधानसभा मुस्लिमबहुल मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता मतदान अधिक होईल अशाप्रकारची अपेक्षा होती. परंतु लोकसभेच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढलेला दिसून आला नाही. सन २०१४ आणि सन २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदानाचा टक्का दोन ते तीन टक्क्यांनी वाढला असला तरी प्रत्यक्षात मुस्लिम वस्त्यांमध्ये फतव्यानंतर झालेल्या मतदानाप्रमाणे विधानसभेत मतदान झाल्याचे दिसून येत नाही. (Assembly Election)

(हेही वाचा – Waqf Board Amendment Bill विषयी संयुक्त संसदीय समितीचा अहवाल तयार)

मुस्लिमबहुल वस्त्यांमधील भायखळा विधानसभेत मागील निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के, मुंबादेवीत ४ टक्के, धारावीत ३ टक्के, चांदिवलीमध्ये शुन्य पूर्णांक ६० टक्के, अणुशक्ती नगर उणे एक टक्का, मालाड उणे एक टक्का, वांद्रे पूर्व ४ टक्के, कलिना दहा टक्के, भायखळा २ टक्के मतदान वाढले तसेच घटलेले पहायला मिळालेले आहे. (Assembly Election)

तर हिंदुबहुल वस्त्यांच्या विधानसभा मतदारसंघांपैकी मुलुंड विधानसभेत मागील निवडणुकीच्या तुलनेत ३ टक्के, बोरीवली ८ टक्के, दहिसर ५ टक्के, मागाठाणे ४ टक्के, भांडुप ६ टक्के, कांदिवली ४ टक्के, चारकोप ५टक्के, गोरेगाव ९ टक्के, अंधेरी पश्चिम १० टक्के, घाटकोप पूर्व ९ टक्के, वांद्रे पश्चिम ८ टक्के अशाप्रकारे मतदानांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: ईव्हीएम नेले त्या बसमध्ये शेवटच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल !)

WhatsApp Image 2024 11 22 at 20.59.26

(हेही वाचा – निकालाच्या पूर्वसंध्येला Nana Patole यांच्या वक्तव्याने खळबळ; म्हणाले, मी आणि देवेंद्र फडणवीस…)

WhatsApp Image 2024 11 22 at 20.52.06

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.