Assembly Election : महायुतीच्या १२ तर मविआच्या ९ बंडखोरांनी घेतली विधानसभेतून माघार

129
Assembly Election : महायुतीच्या १२ तर मविआच्या ९ बंडखोरांनी घेतली विधानसभेतून माघार
Assembly Election : महायुतीच्या १२ तर मविआच्या ९ बंडखोरांनी घेतली विधानसभेतून माघार

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी करत अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे पक्षातील प्रमुख नेत्यांची दिवाळी बंडखोर उमेदवारांची नाराजी दूर करण्यात आणि त्यांची समजूत काढण्यात गेली. अशातच दि. ४ नोव्हेंबर हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सकाळपासूनच कोण उमेदवार अर्ज मागे घेणार याकडे कार्यकर्त्यांचे डोळे लागले होते. (Assembly Election)

( हेही वाचा : माहीम मतदारसंघात तिरंगी लढत; Sada Sarvankar निवडणूक लढवणार

दरम्यान महायुतीच्या १२ बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. यामध्ये बोरीवलीतून भाजपचे गोपाळ शेट्टी, लातूरमधून विश्वजीत गायकवाड, बुलढाण्यातून विजयराज शिंदे, आणि मध्य नागपूरमधून भाजपच्या किशोर समुद्रे, पालघरमधून अमित घोडा, श्रीगोंद्यातून प्रतिभा पाचपुते आणि शेवगाव- पाथर्डीमधून गोकुळ दौंड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तसेच शिवसेनेतील (शिंदे गट) अंधेरी पूर्वमधून स्वीकृती शर्मा, बोईसरमधून जगदी धोडी, श्रीरामपूरमधून प्रशांत लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तर अजित पवार गटातून चिंचवडमधून नाना काटे, नेवासामधून अब्दुल शेख यांनी अर्ज मागे घेतला आहे. (Assembly Election)

तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा) मधील धारावीमधून बाबुराव माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर काँग्रेसकडून शहादा तळोदामधून सुहास नाईक, नंदुरबारमधून विश्वनाथ वळवी, अकोल्यातून मदन भरगड, नागपूर पूर्वमधून तानाजी वनवे आणि भायखळामधून मधू चव्हाण, कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच चोपड्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या डॉ. चंद्रकांत बारेला, माढ्यातून शिवाजी कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. (Assembly Election)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.