Assembly Election : मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचणार निवडणूक कर्मचारी; का आणि कशासाठी जाणून घ्या

1167
Assembly Election : मतदारांच्या घरांपर्यंत पोहोचणार निवडणूक कर्मचारी; का आणि कशासाठी जाणून घ्या
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील मागील लोकसभा निवडणुकीत मतदानाचा अनुभव घेता आता निवडणुकीची जबाबदारी असलेल्या मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी या मतदान केंद्र आणि मतदारांची संख्या यामध्ये सुसुत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे जिथे मतदान केंद्र ३० पेक्षा अधिक होती, तेथील संख्या आता २५ केंद्रावर आणण्यात आली आहे, तसेच एकाच मतदान केंद्रावर १५०० पेक्षा अधिक मतदारांची संख्या होती ती कमी करून सुमारे १२०० पर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता मतदान केंद्रावरील गर्दीचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला असून या बदलेल्या मतदान केंद्र आणि त्यांची माहिती प्रत्येक मतदारांना घरोघरी जावून दिली जाणार आहे. जेणेकरून प्रत्येक मतदारांना आपले मतदान केंद्र कोणते याची माहिती होणार आहे. (Assembly Election)

(हेही वाचा – Assam मध्ये बेकायदा बांधकाम तोडणाऱ्या पथकावर मुसलमानांचा हल्ला; अनेक पोलीस जखमी)

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यामध्ये विविध यंत्रणांनी केलेल्या पूर्वतयारींचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात शुक्रवारी १३ सप्टेंबर २०२४ रोजी बैठक आढावा घेतला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध मतदारसंघांमधील मतदान केंद्रांची स्थिती, आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती, मतदार याद्यांची स्थिती आणि नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदान संयंत्र ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम, संवेदनशील मतदान केंद्रांची यादी, पोलिस आणि निवडणूक यंत्रणा यांच्याकडून विविध मतदारसंघांमध्ये संयुक्त पाहणी आदींबाबत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर आणि विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार यांनी आढावा सादर केला. यावेळी निवडणुकीच्या कामकाजात कोणतीही कसूर राहू नये, यासाठी योग्य ती काळजी घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने, सहकार्याने कार्य करावे. कोणत्याही लहानात लहान अडचणीलाही गांभीर्याने घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही त्यांनी या बैठकीत संबंधित यंत्रणांना दिले. (Assembly Election)

(हेही वाचा – Port Blair चे नामांतर केले ‘श्री विजयपुरम’; गुलामगिरीच्या प्रतिकापासून आणखी एक ठिकाण मुक्त)

संपूर्ण स्थिती जाणून घेत प्रक्रियेचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीशी (Assembly Election) संबंधीत मुंबईतील सर्वच यंत्रणांकडून उत्तम पद्धतीने काम सुरू आहे. मतदानाची टक्केवारी वाढवणे अत्यंत महत्वाचे असल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली यंत्रणा पोहोचेल, हे सुनिश्चित करावे. मतदार यादीमध्ये मतदारांची नाव नोंदणी करणे इत्यादी प्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण करावी. नागरिकांना त्यांच्या निवासाच्या ठिकाणापासून अगदी जवळ मतदान केंद्र उपलब्ध करुन देण्यासाठी सुलभ रचनेवर भर देण्यात आला आहे. त्याअनुषंगाने देखील गृहनिर्माण संस्थांशी पुन्हा एकदा भेटी देऊन समन्वय साधावा. संपूर्ण कामकाजादरम्यान कोणत्याही प्रकारची लहानात लहान अडचण असेल तरी ती आपल्याकडे न ठेवता त्यावर वेळीच आणि योग्य पद्धतीने तोडगा निघावा, यासाठी वरिष्ठांशी वेळोवेळी चर्चा करावी. निवडणुकीसंदर्भातील संपूर्ण तयारी अत्यंत चोखपणे आणि जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देशही गगराणी यांनी यावेळी दिले. (Assembly Election)

(हेही वाचा – Shiv Sena UBT चा सुद्धा आरक्षण रद्द करण्याला पाठिंबा)

या बैठकीत अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई शहर), संजय यादव, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी (मुंबई उपनगरे) राजेंद्र क्षीरसागर, सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी आणि संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.