महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू झाली. सुरुवातीपासूनच निकालाचे कल हे महायुतीच्या बाजूने होते, दुपारपर्यंत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्याचे समोर आले. यात भाजपाचे वोट शेअर आणि स्ट्राईक रेट सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. (Assembly Election Result)
(हेही वाचा निकाल स्पष्ट होताच Eknath Shinde यांचे महत्वाचे विधान; मुख्यमंत्री पदाविषयी आमचं काही ठरलेच नव्हते)
20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान झाले, त्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी निकाल घोषित करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत भाजपाचा स्ट्राइक रेट 83% आहे, तर शिवसेना शिंदे यांचा 67%, राष्ट्रवादी (अजित पवार) 66% आहे तर काँग्रेसचा स्ट्राईक रेट 18%, शिवसेना UBT चा स्ट्राईक रेट 21% , राष्ट्रवादी (शरद गट) 13% असा स्ट्राईक रेट आहे. भाजपला सर्वात जास्त 24 टक्के मते मिळाली आहेत. (Assembly Election Result)
Join Our WhatsApp Community