‘या’ राज्यातील मुख्यमंत्रीच पिछाडीवर! तर कोण आहे आघाडीवर?

144

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश असून सुरुवातीचे कल आता हाती आले असून कोणत्या राज्यात कोणाची सत्ता आहे हे चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. या मतमोजणीवरून पाचही राज्यांचे भवितव्य ठरणार आहे. या निवडणुकीचे पहिले कल आले असून या निवडणुकीत पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने मुसंडी मारली असून सत्तेच्या दिशेने आम आदमी जात आहे. दुसरीकडे गोव्यामध्येही भाजपमध्ये विजयाच्या दिशेन वाटचाल करत आहे. या निवडणुकींच्या कलांमध्ये विशेष म्हणजे सध्या तीन विद्यमान मुख्यमंत्री पिछाडीवर आहेत.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदी गृहराज्य गुजरातच्या दौऱ्यावर! काय आहे कारण?)

गोवा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साखळी मतदार संघातून 400 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे दोन्ही उपमुख्यमंत्री पिछाडीवर आहेत. गोव्यामध्ये प्रमोद सावंत हे देखील दोन राऊंडपर्यंत पिछाडीवर होते पण अखेर त्यांचा विजय झाला. गोव्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देखील पिछाडीवर असल्याचं दिसतंय. गोव्यात सध्याच्या कलानुसार भाजप 18, काँग्रेस 11, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष 5, अपक्ष 2, गोवा फॉरवर्ड 1 आणि आप 1 जागेवर आघाडीवर आहे.

पंजाब

एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आपचीच सत्ता येताना दिसत आहे. पंजाबमध्येही गोव्या सारखीच परिस्थिती असून पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, नवज्योतसिंग सिद्धू आणि अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल आदी दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पिछाडीवर आहेत. तर आपला दिलासा असून पंजाबमध्ये सर्वांत आघाडीवर असूनही राज्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार भगवंतसिंग मान आघाडीवर आहेत.

उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातून 4 हजार 464 मतांनी आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे देखील आपल्या करहल मतदारसंघातून आघाडीवर आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात भाजपला 249 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, सपाला 111 जागांवर आघाडी मिळाली आहे. अपना दल 12 जागांवर बीएसपी 5 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर, जनता दल यू 1, जनसत्ता दल लोकतांत्रिक 2, निर्बल इंडियन शोषित हमारा आम दल 5 जागा, राष्ट्रीय लोक दल 8 आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 3 जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंत 399 जागांचे कल हाती आले आहेत.

उत्तराखंड

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे खतिमा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. उत्तराखंडमध्ये 43 पेक्षा जास्त जागांवर भाजप तर काँग्रेस 22 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.

मणिपूर

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हेनगांग मतदारसंघातून 2,598 मतांनी आघाडीवर आहेत. मणिपूरमध्ये भाजप आतापर्यंतच्या कलांमध्ये सर्वात आघाडीवर आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.