Assembly Election Results 2024: अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपाची मोठी फिल्डिंग; ‘या’ ६ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

55
राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान पूर्ण झाले असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे राज्याच्या (Maharashtra Assembly Election Result 2024) सत्तेची चावी कुणाच्या हाती पडणार? याचं चित्र अवघ्या काही तासांतच स्पष्ट होणार आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी (Exit Polls) राज्यात महायुती पुन्हा सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा केला असला तरी मतदारांचा नेमका कौल काय असणार, हे शनिवार २३ नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निकालानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. दरम्यान, विधानसभेच्या निकालापूर्वी अपक्ष आणि बंडखोर नेत्यांशी (Rebel Leader) संपर्क साधायला सुरुवात केली आहे. यासाठी भाजपाने (BJP) आपल्या सहा नेत्यांवर ‘ही’ जबाबदारी सोपवली आहे.  (Assembly Election Results 2024)
या’ सहा नेत्यांवर जबाबदारी
त्यातच आता भाजपाकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी होणाऱ्या उमेदवारांवर करडी नजर आहे. बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपानं सहा नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar), संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरे (Niranjan Dawkhare) यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजपा आणि महायुतीकडून फिल्डिंग लावली जात आहे. आता अपक्ष आणि बंडखोरांना गळाला लावण्यात नेमकं कुणाला यश येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024: ईव्हीएम नेले त्या बसमध्ये शेवटच्या सीटखाली सापडले नोटांचे बंडल !)

महायुती आणि महाविकास आघाडीवर मोठी जबाबदारी 
दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निकाल जाहीर होणर आहे. यावेळी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या गोटात हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांना गळाला लावण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुती समोर असणार आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.