- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसने कर्नाटक आणि तेलंगणामधील काही नेत्यांवर सोपवली आहे. निवडणुकीसाठी या राज्यातून कोट्यवधी रुपये येथून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करा, अशी मागणी करणारे निवेदन निवडणूक आयोगाला देणार असल्याची माहिती शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. (Assembly Election)
(हेही वाचा – BJP च्या २३ उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी शोधला ‘हा’ मुहूर्त)
लोकसभा निवडणुकीत कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांतून महाराष्ट्रात पैसा आला होता. महायुतीला याचा फटका बसला. त्यामुळे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर सील करण्याची गरज आहे, असे पावसकर यांनी सांगत निवेदन देणार असल्याचे म्हटले. एकीकडे छोटी रक्कम पकडल्याचे दाखवायचे, दुसरीकडे मोठे घबाड यांच्याच घरी पाठवायचे असा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. (Assembly Election)
(हेही वाचा – Assembly Election : हॉटेल ट्रायडेंट आणि नरिमन पॉईंट भागात इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी ?)
माहिम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांच्या विरोधात अमित ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. आदित्य ठाकरे यांना वरळीतून ज्यावेळी उमेदवारी मिळाली, तेव्हा मनसेने उमेदवार दिला नव्हता. परंतु, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, मराठी माणूस आणि मराठी अस्मिता सोडणाऱ्या ठाकरेंनी पुतण्याच्या विरोधात उमेदवार देऊन नाते तोडल्याचा आरोप पावसकर यांनी केला. माहिममधून सदा सरवणकर विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ही पावसकर यांनी टीकास्त्र सोडले. (Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community