Assembly Election : भाजपामधील नाराजांच्या नाराजीचा शरद पवार गट फायदा उचलणार

भाजपाच्या काही बड्या नेत्यांना गळ्याला लावण्याची तयारी

98
Assembly Election : भाजपामधील नाराजांच्या नाराजीचा शरद पवार गट फायदा उचलणार

विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election) पडघम आता वाजू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना देखील तेवढाच वेग आलेला आहे. यातच शरद पवार यांनी नाराजांना आपल्याकडे फोडण्याचे काम सुरू केले आहे. कोल्हापुरात शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. कोल्हापूरच्या कागलमधील भाजपा नेते समरजित सिंह घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

(हेही वाचा – China ची सीमेवर पुन्हा कुरघोडी; लडाखच्या सीमेवर हेलीस्ट्रीप)

समरजित सिंह घाटगे हे महाविकास आघाडीकडून कागलमध्ये विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे. घाटगे यांच्या उमेदवारीमुळे महायुतीत मंत्री हसन मुश्रीफ यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व नेत्यांनी विविध मतदारसंघात चाचपणी सुरु केली आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार गटाकडून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार हसन मुश्रीफ असल्याने समरजीत सिंह घाटगे यांची नाराजी उघड झाली आहे.

(हेही वाचा – ‘The Diary of West Bengal’ चित्रपटाने मांडले पश्चिम बंगालमधील हिंदूंच्या भीषण दुःस्थितीचे वास्तव)

तर दुसरीकडे इंदापूरमध्येही विधानसभेला राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Election) महायुती आणि महाविकास आघाडीतील काही नेते पक्षांतर करतील, असे दावे केले जात आहेत. दरम्यान, मतदारसंघातील बदलेल्या परिस्थितीमुळे समरजित सिंह घाटगे आणि हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे दोन प्रमुख नेते पक्षांतर करून शरद पवार गटात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.