Assembly Election : मुख्यमंत्रिपदासाठी उबाठाची तडजोडीची तयारी; काँग्रेसचा १०५, शरद पवार गटाचा ८८ जागांवर दावा!

84
Assembly Election : मुख्यमंत्रिपदासाठी उबाठाची तडजोडीची तयारी; काँग्रेसचा १०५, शरद पवार गटाचा ८८ जागांवर दावा!
  • प्रतिनिधी

कुठल्याही स्थितीत मुख्यमंत्रिपद पाहिजेच, असा हट्ट नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी ही मागणी अजिबात सोडलेली नाही, असे मविआच्या जागावाटप बैठकीत स्पष्ट झाले. मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसपेक्षा १० जागा कमी घेण्याची तयारी उबाठाने जागावाटप बैठकीच्या पहिल्या दिवशी म्हणजे १८ सप्टेंबर रोजी दाखवली. (Assembly Election)

काँग्रेसच्या भूमिकेवरही नाराजी

काँग्रेसने १०५, उबाठाने ९५ आणि शरद पवार गटाने ८८ जागा लढवाव्यात असा प्रस्ताव त्यात मांडला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बैठकीत जागावाटपावर चर्चा झालीच नाही, असा दावा केला. आणखी दोन दिवस हे बैठकांचे सत्र चालणार आहे. दरम्यान, बैठकीला येण्यासाठी काँग्रेसचे राज्यातील नेते तयार नव्हते. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीकाही केली होती. (Assembly Election)

(हेही वाचा – सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; CM Eknath Shinde यांनी काढले गौरवोद्गार)

कोण आहे कुठे पुढे ?

मविआतील नेत्यांनी २८८ जागांचा आढावा घेतला आहे. त्यामध्ये काँग्रेस विदर्भात मजबूत स्थितीत आहे. उबाठा मुंबईसह कोकणात तर राष्ट्रवादी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात आपली ताकद दाखवण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये मविआलाच बहुमत मिळेल, असे प्रास्ताविक करून सुरूवात झाली. काँग्रेसने ११५ जागांवर दावा केला आहे. मात्र, राहुल गांधींच्या आदेशानुसार ते १०५ जागांवर थांबतील, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. (Assembly Election)

तारीख पे तारीखमुळे राऊत भडकले

काँग्रेसचे नेते फारच व्यग्र, तारखांवर तारखा देत आहेत जागा वाटप बैठकीची तारीख, वेळ, ठिकाण आधी कळवूनही काँग्रेसचे नेते वेळेवर पोहोचले नाही. त्यामुळे उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस पक्ष सध्या खूप व्यग्र आहे, तरीही आम्ही हे संपवावे, यासाठी गुरुवारी त्यांना बोलावले. तरीही ते तारखांमागून तारखा देत आहेत. (Assembly Election)

(हेही वाचा – INDI Alliance चे अस्तित्व संपुष्टात ?)

उबाठा पुन्हा एकदा आक्रमक

सूत्रांनुसार, ६ ते ८ ऑगस्टदरम्यान उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. मुख्यमंत्रिपदासाठी माझाच चेहरा द्यावा, अशी मागणी केली. त्यावर प्रचारात ही बाब समोर आणली जाईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याची घाई नाही, असे म्हटले. त्यामुळे शांत झालेली उद्धवसेना या बैठकीत आक्रमक झाल्याचे दिसले. (Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.