महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली. मात्र दि. ४ ऑक्टोबरपर्यंत कोणता उमेदवार अर्ज मागे घेणार हे कळेल. त्यातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत असताना, काही मतदारसंघात बंडानंतरच्या शिवसेनेतील दोन गट आणि राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party) दोन गट आमनेसामने येणार आहेत. (Assembly Election)
महायुतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena) असून उबाठा गट महाविकास आघाडीत आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीत आहे. तरी राज्यातील ४७ विधानसभा मतदारसंघात (Assembly Election)शिवसेना विरुद्ध शिवसेना (उबाठा) अशी लढत होणार आहे. तर ३६ मतदारसंघात राष्ट्रवादी (अ.प) विरुद्ध राष्ट्रवादी (श.प) अशी लढत होणार आहे. (Assembly Election)
शिवसेना विरुद्ध शिवसेना (उबाठा) लढत (Shiv Sena)
कोपरी-पाचपाखडी, महाड, राधानगरी, राजापूर, सावंतवाडी, कुडाळ,रत्नागिरी, दापोली,पाटण,सांगोला,परांडा, कर्जत, मालेगाव बाह्य, नांदगाव,वैजापूर,संभाजीनगर पश्चिम, संभाजीनगर मध्य, सिल्लोड, कळमनुरी, रामटेक, मेहकर, पाचोरा, भायखळा, माहिम, जोगेश्वरी पूर्व, मागाठाणे, कुर्ला, विक्रोळी, दिंडोशी, चेंबूर, अंधेरी पूर्व, भांडुप, शिवडी, अंबरनाथ, कल्याण पश्चिम, भिंवडी ग्रामीण, कल्याण ग्रामीण आणि ओवळा-माजिवडा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध शिवसेना (उबाठा) अशी थेट लढत होणार आहे. (Assembly Election)