Assembly Election : अणुशक्तीनगरमध्ये स्वरा भास्कर पतीसाठी निवडणूक प्रचारात उतरणार का?

या मतदार संघात पतीच्या निवडणूक प्रचारात स्वरा भास्कर सहभागी होण्याची शक्यता आहे. स्वरा भास्कर हिची ओळख डाव्या विचारांची, तथाकथित पुरोगामी आणि तुकडे तुकडे गँगची सदस्य अशीच आहे.

132

विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election) राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने त्यांची उमेदवारी यादी जाहीर केली. यामध्ये अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून अभिनेत्री स्वरा भास्कर यांचा पती फहाद अहमद याला उमेदवारी देण्यात आली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक हिला उमेदवारी देण्यात आली आहे.

फहाद अहमद हे समाजवादी पक्षातील नेते होते, पण त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊनच त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कराचे पती आहेत. समाजवादी पक्षाकडून येथील मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून ते इच्छुक होते. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीकडून (NCP) त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अनुशक्तीनगर मतदारसंघात आमच्याकडे खूप चांगले कार्यकर्ते आहेत, मात्र फहाद अहमद हे काही महिन्यांपासून तिकडे स्थानिक आहेत. (Assembly Election)

(हेही वाचा विधानसभा निवडणुकीत Fake Narrative चालणार का? देवेंद्र फडवणीस म्हणाले… )

या मतदार संघात पतीच्या निवडणूक प्रचारात स्वरा भास्कर सहभागी होण्याची शक्यता आहे. स्वरा भास्कर हिची ओळख डाव्या विचारांची, तथाकथित पुरोगामी आणि तुकडे तुकडे गँगची सदस्य अशीच आहे. त्यामुळे स्वरा भास्कर अनेक मुद्यांवर वादात सापडते. स्वरा भास्कर जर प्रचारात उतरली तर ती कोणती वादग्रस्त विधाने करणार ती विधाने चर्चेत येणार हे निश्चित.

अनुशक्तीनगर मतदारसंघात 2019 साली काय

अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघ (Assembly Election) हा मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवाब मलिक 65,217 मते मिळवून विजयी झाले. शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. दोघांमधील विजयाचे अंतर 12,751 मते एवढे आहे. तर, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे तुकाराम रामकृष्ण काटे 39,966 मते मिळवून विजयी झाले होते. तेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नवाब मलिक यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघाची पुढील निवडणूक ऑक्टोबर 2024 मध्ये आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.