५ राज्यांत निवडणुका : संजय राऊतांनी काय पाहिले स्वप्न? जाणून घ्या…

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेनेचे स्वप्न बोलून दाखवले आहे. त्यामुळे हे स्वप्न शिवसेना कितपत साकार करते हे येणार काळच ठरवणार आहे.

देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांत निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. अशावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लागलीच शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा केली. विशेष म्हणजे अन्य राज्यांतही महाविकास आघाडी निर्माण करणार आहे, असेही स्वप्न संजय राऊत यांनी मांडले.

(हेही वाचा ५ राज्यांतील निवडणुका घोषित, १० मार्चला लागणार निकाल)

सेनेची तयारी सुरु 

शिवसेना नक्कीच गोव्यात आणि उत्तर प्रदेशात लढण्याची तयारी करत आहे. गोवा, उत्तर प्रदेश, पंजाबमध्ये इतर मोठे पक्ष आहेत. ते नक्कीच चांगली तयारी करत आहेत. त्यांचा प्रचार, बॅनर, होर्डिंग दिसत असतील. तसे काही शिवसेनेचे दिसत नसेल पण शिवसेनेचा विचार आणि भूमिका लोकांपर्यंत जात असते. आमचे कार्यकर्ते निवडणुका लढवत असतात आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणे आमचे कर्तव्य आहे, असे राऊत म्हणाले.

डिपॉझिट जप्त करून घेण्यासाठी शिवसेनेला पैसे मिळतात, म्हणून ते उत्तर प्रदेश आणि गोव्यात निवडणूक लढवत आहेत. शिवसेना सोयीनुसार म्हणते की, भाजप विरोधकांच्या लोकांना गळाला लावते, विरोधक का लहान मुले आहेत का, सध्या राऊतांना कुणी गांभीर्याने घेत नाही.
– संजय राऊत, शिवसेना नेते.

महाविकास आघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरु 

त्याचबरोबर शिवसेना स्वबळावर लढणार का किंवा अन्य राज्यात महाविकास आघाडीसारखा प्रयोग होईल? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केले. ‘गोव्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. निदान गोव्यात तरी असा एखादा प्रयोग व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे नक्कीच एकत्र लढण्याच्या विचारात आहेत. काँग्रेसने आमच्यासोबत राहावे यासाठी मी स्वत: गोव्यात जाऊन प्रयत्न केले आहेत. पण जागा वाटपाबाबत काही अडचणी आहेत. काँग्रेसला अजूनही वाटते की ते स्वबळावर सत्तेत येतील. त्यांना वाटते की त्यांच्या 22 जागा येतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा. आम्हाला असे वाटते की भाजपला रोखण्याची ताकद जर कुणामध्ये असेल तर त्यांनी सत्तेत यावे. त्यांना वाटते की गोव्यात, उत्तर प्रदेशात ते स्वबळावर सत्तेत येतील तर त्यांनी यावे. पण आम्ही अजून काही दिवस प्रयत्न चालू ठेवू. आम्ही सर्व जागांवर लढू असे कधीच म्हटले नाही. पण गोवा आणि उत्तर प्रदेशात आम्ही काही जागांवर नक्की लढू, असेही राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here