Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात न घेण्याची भाजप कार्यकर्त्यांची भूमिका

193
Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात न घेण्याची भाजप कार्यकर्त्यांची भूमिका
Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या नेत्यांना पक्षात न घेण्याची भाजप कार्यकर्त्यांची भूमिका

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2024) ज्या नेत्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही, त्या नेत्यांनी बंडखोरीचा मार्ग निवडला होता. ते नेते बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सर्वच पक्षीय नेत्यांनी केलेली बंडखोरी सर्वांसाठीच डोकेदुखी ठरली होती. भाजपच्या (BJP) सत्कार मेळाव्यात बंडखोरांना पक्षात घेऊ नये, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. (Assembly Elections 2024)

हेही वाचा- मानवी तस्करी प्रकरणी NIA ची देशभरात 22 ठिकाणी छापेमारी

भाजपच्या आमदारांसह शहराध्यक्षांची बंडखोरांना पक्षात न घेण्याची भूमिका अनेक स्थानिक नेते मांडताना दिसत आहेत. नाशिकमध्ये (Nashik) येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निष्ठावान विरुद्ध बंडखोर हा वाद सुरू झालाय. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात दिनकर पाटील यांनी बंडखोरी केली होती. दिनकर पाटील यांना मनसेने उमेदवारी दिली होती. चांदवड विधानसभा मतदारसंघात राहुल आहेर यांच्याविरोधात केदा आहेर यांनी बंडखोरी केली होती. याशिवाय जयश्री गरुड यांनी बालगाणमध्ये दिलीप बोरसे यांच्याविरोधात बंडखोरी केली होती. इतकचं नाही तर भाजपच्या काही स्थानिक नेत्यांनी विरोधी पक्षातील उमेदवारांचा प्रचार देखील केला होता. (Assembly Elections 2024)

हेही वाचा- INS Arighat वरून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल ढिकले (Rahul Dhikle) म्हणाले, “मागच्या पाच वर्षांपूर्वी माझ्या विरोधात आपल्याच पक्षातून मला आव्हान देण्यात आलं. मी मागच्या पंचवार्षिक मध्ये गप्प बसलो पण आता पक्षाने तसं करू नये. सोडून गेलेल्यांना आता पुन्हा पक्षप्रवेश देऊ नका. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भाजप पक्ष हा एक हाती सत्ता मिळवल्याशिवाय राहणार नाही. आता हिंदुत्वाची लाट आहे, त्यामुळे एखादी सत्ता मिळवण्यामध्ये आपण सर्व काम करू. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता बळ द्या. ज्यांनी चांगले काम केले आहेत निवडणुकीत कष्ट घेतले आहे त्यांना चांगले पद द्या. माझा विजय हा माझ्या एकट्याचा नाही तर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांचा विजय आहे.” असं ते म्हणाले आहेत. (Assembly Elections 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.