नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या राज्यातील विधानसभा निवडणूकांच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जागा वाटपाचा निश्चित फार्मूला अजूनही समोर आलेला नाही. महायुती तसेच महाविकास आघाडी कडून घटस्थापनेचा मुहूर्त साधला जाण्याच्या बतावण्या सर्वच राजकीय पक्षांनी केल्या होत्या. परंतु हा मुहूर्त देखील राजकीय पक्षांकडून साधला गेला नाही. याउलट अजूनही जागा वाटपाचं गुऱ्हाळ काही जागांवरून अडून बसल आहे.
(हेही वाचा – Navratri 2024 : महाभोंडल्याच्या निमित्ताने ठाणे शहरात चैतन्याची अनुभूती !)
विदर्भात काँग्रेसला हव्यात ४० जागा
महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून विदर्भात आपली चांगली ताकद असून या ठिकाणी महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसला ४० जागा हव्या आहेत अशी मागणी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांकडून करण्यात आली. महाविकास आघाडीतील इतर सहकारी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यासाठी तयार होत नाही त्यामुळे अजूनही विदर्भावरून जागा वाटपांचे गुऱ्हाळ आणखीन काही दिवस चालूच राहणार असल्याचे दिसून येत आहे. जागा वाटपांच्या या चर्चांमध्ये तिन्ही पक्षांचे वरिष्ठ बसूनच तोडगा काढतील असाच काहीसा प्रकार समोर येत आहे. (Assembly Elections 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community