विधानसभा निवडणूक (Assembly elections 2024) रंगात आलेली असतानाच गुहागरमध्ये महायुतीमध्ये पुन्हा एकदा नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिवसेनेचा प्रचार थांबवला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपाचे माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गुहागर विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रचार थांबवला आहे.
फक्त गुहागरच नाही तर दापोली विधानसभा मतदारसंघात देखील शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारावर देखील याचा परिणाम होताना दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपाचा पदाधिकारी यांनी स्पष्टपणे नाराजी प्रकट करत बैठक घेऊन प्रचार थांबवला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी या प्रचारातन अंग काढले आहे. (Assembly elections 2024)
(हेही वाचा – Raj Thackeray ची वरळीकरांना गॅरंटी, आमचा आमदार आला तर अपॉईंटमेंटशिवाय भेटता येईल)
रामदास कदम यांना मनोरुग्ण जाहीर करून नजर कडे ठेवा…
कोकणातील दापोली मतदार संघातून योगेश कदम तर गुहागरमधून रामदास कदम यांचा दुसरा मुलगा सिद्धेश कदम याला उमेदवारी मिळवण्यासाठी रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा डाव होता. असादेखील आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी रामदास कदम यांना नजरकैदेत ठेवावे किंवा मनोरुग्णालयात ठेवावे, अशी मागणी भाजपाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे केली आहे. (Assembly elections 2024)
मुख्यमंत्र्यांचा मनधरणीचा प्रयत्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रत्नागिरीत येऊन भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या समवेत दोन्ही तालुका अध्यक्षांसमवेत बैठक घेऊन भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे. तरीदेखील स्थानिक नेतृत्वाने भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाला निकालानंतर वेगळे परिणाम आले तर त्यासाठी आम्ही जबाबदार नसल्याचे देखील कळवल्याचे समजते. यामुळे महायुती मध्ये कोकणात मोठी दरी निर्माण झाली आहे. (Assembly elections 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community