विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) तयारी सर्वच पक्षांनी केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख आघाडीमध्ये लढत असल्याचे सध्या दिसत असले तरी इतरही अनेक राजकीय पक्ष, डावे, वंचित आणि तिसरी आघाडी प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे. यामध्ये आता महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे. मनासारख्या जागा मिळाल्या नाही तर महायुतीमधून बाहेर पडून संपूर्ण २८८ जागांवर निवडणूक लढण्याचा इशारा रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे.
महायुतीमध्ये रासप, रिपाई असे विविध घटक पक्ष आहेत. या पक्षांचा एक मतदार वर्ग आहे. त्यामुळेच महायुती असेल किंवा महाविकास आघाडी यामध्ये या पक्षांनाही मानाचे स्थान आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) महायुतीने आम्हाला ४० जागा दिल्या पाहिजे, अन्यथा आम्ही संपूर्ण २८८ जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अमरावती येथील पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे.
(हेही वाचा – Middle East Tension : मध्य-पूर्वेतील अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय आणि कसा परिणाम होतोय?)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी देखील आपल्या पक्षासाठी महाराष्ट्रातील अकरा ते बारा जागांसाठी मागणी केली आहे. अशाच प्रकारची मागणी महाविकास आघाडीमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना यांनीही केली आहे. योग्य मानसन्मान न मिळाल्यास आपण देखील वेगळा विचार करू शकतो असा काहीसा इशाराच या छोट्या पक्षांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील मोठ्या पक्षांना दिला आहे.
महायुती असो किंवा महाविकास आघाडी यामध्ये असलेले छोटे पक्ष हे आपापल्या समाजाच्या मतांच्या जोरावर मोठ्या पक्षांना आपली हिस्सेदारी मागत असतात. परंतु या छोट्या पक्षांच्या दबावाखाली मोठे पक्ष किती येतात हा येणारा काळाच ठरवेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community