Assembly Elections Exit Poll 2023 : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपला संधी; छत्तीसगडमध्ये काय होणार ?

Assembly Elections Exit Poll 2023 : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपला संधी; छत्तीसगडमध्ये काय होणार ?

168
Assembly Elections Exit Poll 2023 : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपला संधी; छत्तीसगडमध्ये काय होणार ?
Assembly Elections Exit Poll 2023 : मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये भाजपला संधी; छत्तीसगडमध्ये काय होणार ?

वंदना बर्वे

पाच राज्यांतील विधानसभा निवडणूक संपताच एग्जिट पोलचे आकडे समोर आले आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगाणा आणि मिझोराम या पाचही राज्यांतील एग्जिट पोलची आकडेवारी भाजप, कॉंग्रेस आणि स्थानिक पक्षांमध्ये अटीतटीची लढत झाली असल्याचे दाखविणारी आहे. कोणत्या राज्यांत कोणत्या पक्षाला सत्ता मिळणार हे तर 3 डिसेंबर रोजीच स्पष्ट होईल; परंतु एग्जिट पोलने आशा पल्लवित केल्या आहेत.

(हेही वाचा – Rehabilitation Housing Project : मुलुंडमध्ये भांडुप, विक्रोळी व घाटकोपरच्या लोकांना नाही स्थान)

मध्यप्रदेश

इंडिया टुडे एक्सेस माय इंडियाच्या एग्जिट पोलनुसार, भारतीय जनता पक्षाला मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) मध्य प्रदेशात एकतर्फी विजयी मिळताना दिसत आहे. भाजपला 140 ते 162 जागा, तर काँग्रेसला 68 ते 90 जागा मिळू शकतात, असे यात म्हटले आहे. अर्थात, भाजप मध्यप्रदेशात चौथ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार हे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत स्पष्ट होईल.

टाईम्स नाऊ ईटीजीच्या एग्जिट पोलनुसार, मध्यप्रदेशात भाजपला 105 ते 117 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 109 ते 125 जागा मिळू शकतात. न्यूज 24 चाणक्यच्या मते, मध्यप्रदेशात भाजपला 151, काँग्रेसला 74 आणि इतरांना 5 जागा मिळू शकतात.

इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलमध्येसुध्दा भाजपला 140 ते 159 जागा मिळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याची शक्यता आहे. ते पाचव्यांदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकतात. तर काँग्रेसला केवळ 70 ते 90 जागा मिळण्याची शक्यता आहे.

तेलंगाणा

तेलंगाणाच्या (Telangana) स्थापनेपासून सत्तेत असलेल्या भारत राष्ट्र समितीला या वेळेस विश्रांती घ्यावी लागू शकते. न्यूज 24 आणि टुडे चाणक्यच्या एग्जिट पोलनुसार, तेलंगाणात कॉंग्रेसला 71 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री कें. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला 33 जागांवर समाधान मानावे लागू शकते. भाजपला सात जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र, असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे खाते सुध्दा उघडणार नाही, असे भाकित वर्तविण्यात आले आहे.

रिपब्लिक टीव्ही—मॅट्रीझनुसार, तेलंगाणात कॉग्रेसला 58 ते 68 जागा मिळू शकतात. भारासला 46—56 जागा मिळू शकतात. भाजपला 4—9 आणि ओवैसी यांच्या पक्षाला 5—7 जागा मिळू शकतात.

टीव्ही 9 भारतवर्षनुसार, तेलंगाणात कॉग्रेसला 49—59 जागा मिळू शकतात. तर भारासला 48—58 जागा मिळू शकतात. भाजप आणि एएमआयएमआयलाही जागा मिळणर आहेत.

राजस्थान

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या अंदाजानुसार, राजस्थानमध्ये (Rajsthan) भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. या एक्झिट पोलनुसार भाजप राजस्थानमध्ये 94 ते 114 जागा जिंकताना दिसत आहे. त्याचवेळी काँग्रेसला केवळ 71 ते 91 जागांवर समाधान मानावे लागू शकते.

छत्तीसगड

Chhattisgarh मध्ये आतापर्यंत 7 एक्झिट पोलपैकी 7 काँग्रेस सरकार स्थापनेचा अंदाज वर्तवत आहेत. भाजप काँग्रेसला कडवी टक्कर देत असल्याचे दिसत आहे. इंडिया टुडे अक्सीस माय इंडियाच्या एग्जिट पोलनुसार, कॉग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 36 ते 46 जागा मिळू शकतात.

मिझोराम

Mizoram आतापर्यंत 2 एक्झिट पोल समोर आले आहेत. यापैकी एकामध्ये त्रिशंकू असेंब्ली सुचवण्यात आली आहे. एकामध्ये, झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) सरकार स्थापन होईल असे दिसते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.