Assembly Elections : माजी खासदारही उतरणार विधानसभेच्या आखाड्यात?

राजकारणात नवा ‘ट्रेंड’; महायुतीसमोर आलेली सत्ता टिकवण्याचे आव्हान; ‘मविआ’ला पुन्हा सत्ता काबिज करण्याच्या आशा; दोन्ही बाजूकडून १४४ ची ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी गणिते

165
Assembly Elections : माजी खासदारही उतरणार विधानसभेच्या आखाड्यात?
Assembly Elections : माजी खासदारही उतरणार विधानसभेच्या आखाड्यात?
  • सुजित महामुलकर

लोकसभा निवडणूकीत अनेक दिग्गज खासदारांना पराभव पत्करावा लागला. गेल्या दोन-तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आलेल्यांनाही मतदारांनी घरी बसवले. अशा काही अस्वस्थ राजकीय नेत्यांना आता वेध लागले आहेत ते विधानसभेचे. दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) तयारीला काही माजी खासदार लागल्याचे समजते. कारण पुढील लोकसभा निवडणूक थेट २०२९ ला होणार असल्याने पाच वर्षे सत्ता आणि कोणत्याही पदाशिवाय सामान्य व्यक्ती म्हणून दिवस काढणे त्यांच्यासाठी कठीण असल्याने लोकसभेतून खाली येत विधानसभेत बसण्यास त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही, हे विशेष.

उमेदवार निवडून आणणे हा प्रमुख उद्देश

लोकसभेनंतर राज्यात महायुतीसमोर आलेली सत्ता टिकवण्याचे आव्हान असेल तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रात गेलेली सत्ता पुन्हा काबिज करण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यासाठी कसल्याही परिस्थितीत १४४ ही ‘मॅजिक फिगर’ गाठण्याची गणिते दोन्ही बाजूकडून आखली जात आहेत. त्यामुळे आपले अधिकाधिक उमेदवार निवडून आणणे हा प्रमुख उद्देश महायुती आणि ‘मविआ’चा असेल.

(हेही वाचा – Mhada Lottery 2024: म्हाडाची मुंबई विभागातील २००० घरांसाठी ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात जाहिरात निघणार)

दोन माजी खासदार आधीच विधान परिषदेवर

शिवसेनेच्या दोन माजी खासदारांनी, भावना गवळी आणि कृपाल तुमाने, लोकसभेनंतर आणि विधानसभेआधीच विधान परिषदेवर जाणे पसंत केल. तुमाने दोन वेळा रामटेक मतदार संघातून लोकसभा निवडणूक जिंकले आहेत तर गवळी या यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभेत गेल्या आहेत. यावेळी या दोन्ही माजी खासदारांना तिकीट देता न आल्याने शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांना शब्द दिला आणि विधानपरिषदेवर निवडून पाठवले.

कॉंग्रेसचा ‘ट्रेंड’ : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच पृथ्वीराज चव्हाण हे यापूर्वीच खासदारकी सोडून आमदार म्हणून कामाला लागले आहेत. यावेळी इतर पक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर हा ‘ट्रेंड’ वापरात येईल, अशी शक्यता आहे.
दिग्गज मतदारांच्या रोषाला बळी

इतर अनेक दिग्गज खासदारांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले पण मतदारांनी त्यांना नाकारले. यातही सलग पाच वेळा लोकसभा निवडणूक जिंकलेले माजी केंद्रीय मंत्री भाजपाचे रावसाहेब दानवे, तसेच भिवंडीचे कपिल पाटील, दिंडोरीच्या भारती पवार, धुळ्याचे सुभाष भामरे हे माजी केंद्रीय मंत्री, गडचिरोली-चिमुरचे अशोक नेते, माढाचे रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, नंदुरबारच्या हीना गावीत, सांगलीचे संजयकाका पाटील, भंडारा-गोंदियाचे सुनील मेंढे, अमरावतीच्या नवनीत राणा असे भाजपाचे खात्रीने निवडून येतील असे उमेदवार या लोकसभेला मतदारांच्या रोषाचे बळी ठरले.
या माजी खसदारांपैकी कपिल पाटील, भारती पवार, अशोक नेते, नवनीत राणा, सुजय विखे हे येत्या विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात पराभूत झालेले एमआयएमचे इम्तियाज जलील सय्यद आणि याच मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेले शिवसेना उबाठाचे चंद्रकांत खैरे हे माजी खासदारही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (Assembly Elections)

(हेही वाचा – Dharavi : पुनर्विकासाच्या समर्थनार्थ स्थानिकांचे जन आंदोलन)

लाभाच्या पदाची लालसा

गेल्या दहा वर्षांत २०-२५ वर्षे नोकरी केल्यानंतर सर्वसामान्य कर्मचारी वयाच्या ५०-५५ नंतर स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र राजकारणी ७०-७५-८० च्या पुढे गेल्यानंतरही राजकारणातून निवृत्ती घेऊन समाजसेवा करण्याची त्यांची इच्छा होत नाही. जनतेने नाकरल्यानंतर राज्यपाल पदावर डोळे लावून बसलेल्यांची संख्याही कमी नाही. सगळ्यांनाच सत्ता, अधिकार व लाभाच्या पदाची लालसा आहे, कर्तव्ये, जबाबदारी कागदावरच आहे का? हाच का सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा गाभा?

खैरे बोहल्यावर

माजी खासदार नवनीत राणा यादेखील विधानसभेसाठी नशीब अजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवनीत यांनी सोमवारी ५ ऑगस्ट पासून मेळघाटच्या शेवटच्या गावापासून आभार व संवाद दौरा काढण्याचा निर्णय घेतला आहे. तर ही विधानसभेसाठी मतदारसंघ चाचपणी असल्याची चर्चा होत आहे. चंद्रकांत खैरे यांनी तर जाहीरच केले की, पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास विधानसभा निवडणूक लढण्यास तयार आहे.

(हेही वाचा – Shaniwar Wada : कहाणी शनिवारवाड्याची! काय आहे शनिवारवाड्याच्या ५ दरवाजांचे वैशिष्ट्य?)

‘उबाठा’ला उमेदवार मिळणे दुरापास्त

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने शिवसेना उबाठाकडे लोकसभेच्या २१ मतदारसंघांसाठी उमेदवारांचीच वानवा होती, त्यामुळेच सांगलीत चंद्रहार पाटील यांना कुस्तीच्या आखाड्यातून थेट लोकसभा रणांगणात उतरवले गेले आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत वादातून त्यांना पाडले गेले. शिवसेना उबाठाला लोकसभेसाठीच उमेदवार मिळत नसताना विधानसभेसाठी ८०-९० उमेदवार मिळणेही दुरापास्त झाले आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे विनायक राऊत आणि ठाण्याचे राजन विचारे, चंद्रकांत खैरे अशा माजी खासदारांना उतरवण्याशिवाय शिवसेना उबाठाकडे पर्याय उरला नाही.

शिवसेनेचे माजी खासदार तयारीत?

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेचे १५ पैकी ७ उमेदवार लोकसभेला निवडून आले तर अन्य आठ पडले. त्या आठमध्ये मुंबई दक्षिण-मध्यचे राहुल शेवाळे, कोल्हापूरचे संजय मंडलिक, शिर्डीचे सदाशिव लोखंडे आणि नाशिकचे हेमंत गोडसे या माजी खासदारांचा समावेश आहे. यामधील शेवाळे, गोडसे आणि मंडलिक हे विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढण्याची दाट शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.