-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मातोश्रीच्या अंगणात आता ठाकरेंचा भाचा निवडणूक लढण्याच्या तयारीला लागला असून वांद्रे पूर्व विधानसभेच्या विभागप्रमुखपदी उबाठा शिवसेनेने नियुक्ती केली आहे. युवा सेनेचे सरचिटणीस असलेल्या वरूण सरदेसाई यांची वांद्रे पूर्व विधानसभेच्या विभागप्रमुखपदी सरदेसाई यांची नियुक्ती करून एकप्रकारे उबाठा शिवसेनेने सरदेसाई यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला आहे. त्यामुळे वरूण सरदेसाई यांच्या या उमेदवारीमुळे मातोश्रीच्या अंगणात घराणेशाहीला प्राधान्य दिले जात असून वांद्र्यातील उबाठा शिवसेनेचे शिवसैनिक हे झेंडे आणि सभेला गर्दी जमवण्यापुरतेच असल्याचे दिसून येत आहे. (Assembly Elections)
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील वांद्रे पूर्व विधानसभेत भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ४७ हजार ५५१ मतदान झाले तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ७५ हजार ०१३ मतदान झाले. त्यामुळे या मतदार संघात सुमारे ४७ हजार मताधिक्य मिळाल्याने या मतदार संघावर उबाठा शिवसेनेची नजर पडली असून तेव्हापासून ठाकरेंचा भाचा असलेल्या वरूण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार वांद्रे पूर्व विधानसभा विभागप्रमुख पदी सरदेसाई यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून एकप्रकारे ठाकरेंनी त्यांना मतदार संघात कामाला लागण्याचे निर्देश दिले आहे. (Assembly Elections)
(हेही वाचा – Chhatrapati Shivaji Maharaj यांचा पुतळा उभारण्यासाठी तज्ज्ञ समिती)
आजवर या मतदार संघातून शिवसेनेचे बाळा सावंत निवडून येत होते, पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. परंतु मागील सन २०१९च्या निवडणुकीत कांग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा विजय झाला होता. या मतदार संघात झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार असले तरी ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेल्याने महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेस न लढता उबाठा शिवसेनेला सोडण्याचा विचारात आहे. त्यामुळे उबाठा शिवसेनेने मातोश्रीच्या अंगणात सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचा निर्धार केला असल्याचे बोलले जात आहे. (Assembly Elections)
या मतदार संघात भाजपानेही चांगली बांधणी केली असून युतीमुळे भाजपाला आजवर संधी मिळाली नाही. परंतु यंदा ही संधी मिळावी यासाठी भाजपा प्रयत्नीशील आहे.सरदेसाई यांचे विधानसभेत स्वागत करण्यासाठी भाजपाची पूर्ण तयारी असून काहीही करा, ठाकरेंच्या भाचाचे स्वागत करण्याची संधी आम्हालाच द्या, नक्कीच वरून आलेल्या वरूणला वरच्या वरच घरी पाठवू असा निर्धार भाजपाने केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community