Assembly Elections : वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत होणार वाद

135
Assembly Elections : वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत होणार वाद
Assembly Elections : वांद्रे पूर्व विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत होणार वाद
  • विशेष प्रतिनिधी,मुंबई

वांद्रे पूर्व विधानसभा मतदार संघात उबाठा शिवसेनेकडून दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात या मतदार संघावर काँग्रेसचा दावाही आहे. या मतदार संघातून पूर्वी शिवसेनेचे आमदार निवडून येत असल्याने उबाठा शिवसेनेने दावा केला असला तरी विद्यमान आमदार हा काँग्रेसचा असल्याने महाविकास आघाडीमध्ये या जागेवरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे या मतदार संघातून काँग्रेसचे सचिन सावंत (Sachin Sawant) यांचे बॅनर झळकू लागल्याने काँग्रेसचा दावा हा पक्का मानला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात जागा वाटपामध्ये या जागेवरून ही जागा कोणाला सोडावी यावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Assembly Elections)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील वांद्रे पूर्व विधानसभेत भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांना ४७ हजार ५५१ मतदान झाले तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना ७५ हजार ०१३ मतदान झाले. त्यामुळे या मतदार संघात सुमारे ४७ हजार मताधिक्य मिळाल्याने या मतदार संघावर उबाठा शिवसेनेची नजर पडली असून तेव्हापासून ठाकरेंचा भाचा असलेल्या आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरूण सरदेसाई (Varsha Gaikwad) यांनी या मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा प्रकट केली. त्यानुसार वांद्रे पूर्व विधानसभा विभागप्रमुख पदी सरदेसाई यांच्या नावाची अधिकृत घोषणा करून एकप्रकारे ठाकरेंनी त्यांना मतदार संघात कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत. (Assembly Elections)

(हेही वाचा – Paris Paralympic Games : रुबिना फ्रान्सिसला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य)

आजवर या मतदार संघातून शिवसेनेचे बाळा सावंत निवडून येत होते, पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांनी नारायण राणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. परंतु मागील सन २०१९च्या निवडणुकीत कांग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा विजय झाला होता. या मतदार संघात झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे आमदार असले तरी ते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) गेल्याने हा मतदार संघातून काँग्रेसच्यावतीने सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी आतापासून बॅनरच्या माध्यमातून आपले मुखदर्शन देण्यास सुरुवात केली आहे. सचिन सावंत (Sachin Sawant) यांनीही या भागातील काँग्रेस खासदाराला ४७ हजारांचे मताधिक्य मिळाल्याने या मतदार संघात लक्ष वेधले आहे. तर भाजपाकडून महेश (कृष्णा) पारकर यांचे चर्चेत आहे. (Assembly Elections)

दरम्यान, महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसकडून लढली जावी आणि यासाठी सचिन सावंत (Sachin Sawant) यांचे नाव चर्चेत असले तरी खासदार वर्षा गायकवाड या हा मतदार संघ ठाकरेंच्या शब्दासाठी उबाठा शिवसेनेला सोडतील आणि त्याठिकाणी काँग्रेसच्या मदतीने सरदेसाई यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करतील असेही बोलले जात आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपाला जागा सोडल्यास आणि महेश पारकर यांना उमेदवारी दिल्यास आणि सरदेसाई किंवा सावंत यांना उमेदवारी मिळाल्यास ते महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात जोरदार टक्कर देऊ शकतात असे बोलले जात आहे. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.