Congress Leader विजय वडेट्टीवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक कठीण

84
Congress Leader विजय वडेट्टीवार यांच्यासाठी विधानसभा निवडणूक कठीण
  • खास प्रतिनिधी

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासतही येणारी विधबसभा निवडणूक निश्चितच सोपी नसणार. नुकत्याच चंद्रपुऱ् लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मोहिमच उघडली असल्याची चर्चा विदर्भात होत आहे. (Congress Leader)

कुणबी मेळावा

काल रविवारी वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात अखिल कुणबी समाज मंडळातर्फे एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर, भाजपाकडून परिणय फुके यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावली होती.

(हेही वाचा – किमान तुमच्या घरात तरी मातृभाषेत बोला; केंद्रीय मंत्री Amit Shah यांनी केले आवाहन)

जेवढी टक्केवारी, तेवढी हिस्सेदारी

मेळाव्याला संबोधित करताना वडेट्टीवार यांचे नाव न घेता धानोरकर यांनी उपस्थित कुणबी समाजाला आवाहन केले की “येत्या विधानसभा निवडणूकीत पक्ष न बघता कुणबी समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या. खोट्या आश्वासनांना बळी न पडता सावधपणे मतदान करा. जेवढी ज्याची टक्केवारी तेवढी हिस्सेदारी हा नियम आता प्रत्येक मतदार संघात लागू केला पाहिजे. जेव्हा जातीचा विषय येईल तेव्हा लक्षात ठेवा पक्ष कुठलाही असो, शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी पण उमेदवार समाजाचा निवडून आणायचा,” असे आवाहन धानोरकर यांनी केले. (Congress Leader)

कुणबी उमेदवार देण्यासाठी आग्रह

भाजपाचे आमदार परिणय फुके यांनीही आपल्या भाषणात ब्रह्मपुरी मतदार संघातून कुणबी समाजाचा उमेदवार देण्यासाठी आग्रह धरू असे आश्वासन यावेळी दिले.

(हेही वाचा – Badlapur Crime : बदलापुरात २२ वर्षीय तरुणीवर लैगिंक अत्याचार, एका तरुणीसह तिघांना अटक)

६० हजार कुणबी मतदार

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विधानसभेत ब्रह्मपुरी मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असून या मतदार संघात जवळपास ६० हजार मतदार कुणबी समाजाचे आहेत. वडेट्टीवार हे तेली समाजातून येतात. मात्र यावेळी कुणबी समाज एक झाला तर वडेट्टीवार यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येणारी निवडणूक वडेट्टीवार यांच्यासाठी कठीण असणार यात शंका नाही.

जुने शीतयुद्ध

प्रतिभा धानोरकर आणि वडेट्टीवार यांचे शीतयुद्ध लोकसभा निवडणुकीपूर्वीचे असून वडेट्टीवार यांनी चंद्रपुर लोकसभा मतदार संघातून आपल्या मुलीला तिकीट मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. तर धानोरकर यांनी थेट दिल्ली गाठत लोकसभा तिकीट पदरात पाडून घेतले आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला. (Congress Leader)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.