Assembly Elections : मुंबईच्या जागांवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये रस्सीखेच

163
Assembly Elections : मुंबईच्या जागांवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये रस्सीखेच
Assembly Elections : मुंबईच्या जागांवरून ठाकरे गट-काँग्रेसमध्ये रस्सीखेच

मुंबईतील विधानसभेच्या ३६ मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ठाकरे गटाचा मुंबईत २० ते २२ जागा लढण्याचा आग्रह आहे. तर काँग्रेसने १५ ते १७ जागांची मागणी लावून धरली आहे. या जागा वाटपावरून दोन्ही पक्षात सहमती न झाल्याने सोमवारी आघाडीत मुंबईतील जागावाटपाचा पेच कायम होता.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागावाटपाच्या बैठकीचा सिलसिला सुरु झाला आहे. काल, रविवारनंतर आज, सोमवारी वांद्रे येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकील मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, अस्लम शेख, भाई जगताप, ठाकरे गटाकडून संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसकडून जितेंद्र आव्हाड आदी नेते उपस्थित होते.

(हेही वाचा – Mumbai Police : एका दिवसात मुंबई पोलिसांकडून महिलांच्या १०८४ तक्रारींचे निवारण)

आजच्या बैठकीत मुंबईतील विधानसभेच्‍या ३६ मतदारसंघांवर चर्चा झाली. मुंबईतील जागावाटपावर निर्णय होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतील जागावाटपावर चर्चा होणार नसल्याचे समजते. २०१९ च्या निवडणुकीत मुंबईत आघाडीतील ज्या पक्षांनी जागा जिंकल्या आहेत, त्या वगळता भाजपाने जिंकलेल्या १६ जागांवर चर्चा सुरु आहे. (Assembly Elections)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. विशेषकरून मुंबईत ठाकरे गटाने तीन जागा जिंकल्याने त्यांनी विधानसभेसाठी २०-२२ जागांची मागणी केली आहे. तर काँग्रेस एका जागेच्या जोरावर किमान १५-१७ जागांसाठी आग्रही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र मुंबईत सात जागांवर दावा सांगितला आहे. विशेष म्हणजे काही मतदारसंघावर ठाकरे गट आंक काँग्रेसनेही दावा केल्याने जागावाटपाचा गुंता वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ठाकरे गटाबरोबर काँग्रेससाठीही महत्वाची आहे. मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकून मुंबई आपलीच आहे, हे दाखविण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. त्यासाठी ठाकरे गट विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, ठाकरे गटाला जास्त जागा देण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होऊ शकला नाही. (Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.