लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुकादेखील होणार; ‘या’ भाजप नेत्याने केला दावा

146

राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच, आता भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभा निवडणुकीबरोबरच विधासभेच्यादेखील निवडणुका होणार असल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात नवनिर्वाचित भाजप सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात दानवे यांनी हे विधान केले आहे.

( हेही वाचा: मुंबईतील अतिधोकादायक इमारतींना स्वयंपुनर्विकासाची परवानगी देणार – फडणवीस )

इतर पक्षातील नेते भाजपात करणार प्रवेश 

दानवे म्हणाले की, हल्लीची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता लोकसभेबरोबर विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. सोबतच राजकीय घडामोड होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील इतर पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावाही दानवे यांनी यावेळी केला आहे. दानवे यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे. दानवे यांनी नवनिर्वाचित सरपंच यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना, आपल्या राजकीय करिअरचेही अनेक किस्से सांगितले. मात्र, याच वेळी गावातील राजकारण याबद्दल नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अनेक सल्लेही दिले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.