Assembly Polls : विधानसभेला महाराष्ट्रात पडले, लोकसभेला उत्तर प्रदेशात हरले, विधानसभेसाठी पुन्हा मुंबईत?

252
Assembly Polls : विधानसभेला महाराष्ट्रात पडले, लोकसभेला उत्तर प्रदेशात हरले, विधानसभेसाठी पुन्हा मुंबईत?

मुंबईत विधानसभेला अपयश आल्यानंतर पक्ष बदलला, महाराष्ट्र सोडून उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली मात्र यश आले नाही. आता पुन्हा मुंबईत नशीब आजमावण्याचा विचार या राजकीय नेत्याने केल्याचे सांगण्यात येते.

राज्यातील विधानसभा निवडणूक निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांच्या, लोकसभेला पडलेल्या उमेदवारांच्या, आजी-माजी आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. विधानसभा ही शेवटची संधी असून आता नाही तर पुढील ४-५ वर्षे अशी संधी मिळणार नाही, या विचाराने सक्रिय नसलेले नेतेही आता सक्रिय झाल्याचे दिसू लागले आहे. (Assembly Polls)

(हेही वाचा – शिवसेना आणि राष्ट्रवादीचा निर्णय ५० ते ६० वर्षात लागेल; Uddhav Thackeray यांचे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह)

उत्तर भारतीयांचा मोठा जनाधार असलेला नेता

उत्तर प्रदेशातील जौनपूर सोडून मुंबईत नोकरी-व्यवसायासाठी आलेल्या कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला आणि पुढे सांताक्रूझ-कलिना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आमदार झाले. मग विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात गृह राज्यमंत्री म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली. उत्तर भारतीयांचा मोठा जनाधार असलेला नेता म्हणून त्यांचे वजन काँग्रेसमध्ये वाढत होते.

कृपाशंकर सिंह हे १९९९, २००४, २००९ अशा तीन विधानसभा निवडणुकीत निवडून आले. मात्र, २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना शिवसेनेचे संजय पोतनीस यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर काही काळ ते राजकीय विजनवासात गेले होते. अखेर त्यांनी २०२१ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. आणि मार्च २०२४ मध्ये त्यांना भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने थेट उत्तर प्रदेशातील जौनपूरमधून लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र तिथेही त्यांचा पराभव झाला. (Assembly Polls)

(हेही वाचा – ‘गुलाबी सरडा’ टीकेवरून Ajit Pawar गट संतापला; म्हणाले संजय राऊत हा… )

आता राज्यातील विधानसभा जवळ आल्याने कृपाशंकर सिंह पुन्हा मुंबईतून नशीब आजमावण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कालिना हा मतदार संघ महायुतीमध्ये शिवसेनेकडे (शिंदे) असला तरी सिंह यांचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेले संबंध लक्षात घेता मतदार संघ आदला-बदली होऊ शकेल, अशी शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.