केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी, ८ जानेवारी रोजी देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. त्यामध्ये गोव्यात १४ मार्च रोजी मतदान होणार आहे, उत्तर प्रदेशात १० फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान ७ टप्प्यात मतदान होणार, उत्तराखंड येथे १४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तसेच मणिपूरमध्येही २७ फेब्रुवारी आणि ३ मार्च या दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
१५ जानेवारीपर्यंत प्रचारसभा, रॅलीवर प्रतिबंद
कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने यंदाच्या वेळी कडक निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. १५ जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री ८ नंतर निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल.
(हेही वाचा अखेर महापौरांच्या तोंडावरचा ‘मॅचिंग मास्क’ गायब, आला एन ९५ मास्क)
असे होणार मतदान
उत्तर प्रदेश
पहिला टप्पा – १० फेब्रुवारी रोजी मतदान
दुसरा टप्पा – १४ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
तिसरा टप्पा – २० फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
चौथा टप्पा – २३ फेब्रुवारी २०२२ रोजी मतदान
पाचवा टप्पा – २७ फेब्रुवारी २०२२
सहावा टप्पा – ३ मार्च २०२२ रोजी मतदान
सातवा टप्पा – सात मार्च २०२२ रोजी मतदान
पंजाब – 14 फेब्रुवारी 2022
उत्तराखंड – 14 फेब्रुवारी 2022
गोवा – 14 फेब्रुवारी 2022
मणिपूर –
पहिला टप्पा – २७ फेब्रुवारी २०२२
दुसरा टप्पा – तीन मार्च २०२२