दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज, गुरूवारी विधिमंडळ अधिवेशनात पाहायला मिळाले. भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी विधानसभेत बोलताना सुशात सिंह राजपूत मृत्यू प्रकरणासह दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधिमंडळात एकच गदारोळ पाहायला मिळाला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची केस पुन्हा ओपन करा. यासह या प्रकरणाची पुन्हा एकदा कसून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केली.
(हेही वाचा – “A फॉर आफताब, A फॉर आदित्य ठाकरे, सगळ्या विकृतींचं नाव एकच!”, नितेश राणेंचा हल्लाबोल)
तब्बल चौथ्यांदा सभागृह तहकूब
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा उल्लेख केला. त्यानंतर नितेश राणेही बोलायला उभे राहिले. त्यानंतर सभागृहात एकच गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये हा गोंधळ इतका झाला की सभागृहातील गोंधळ आणि वाढता गदारोळ पाहता थेट विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत तब्बल चौथ्यांदा सभागृह १० मिनिटांसाठी तहकूब करण्याचा निर्णय घेतला.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचे पडसाद आज राज्याच्या नागपूर हिवाळी अधिवेशानातही पाहायला मिळाले. यावेळी भरत गोगावले यांनी एयू प्रकरणामुळे महाराष्ट्राची बदनामी झाल्याचा आरोप करत याप्रकरणी सरकराने चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. भरत गोगावले यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ज्यानंतर शिंदे गट, भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका मांडली. तर भाजप आमदार नितेश राणे या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला.
… यातून महाराष्ट्राची बदनामी होतेय
याप्रकरणावर बोलताना भरत गोगावले म्हणाले की, कालपासून आजपर्यंत गेली दोन दिवस दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत जे एयू प्रकरण गाजत आहे ते नेमकं काय आहे? हे कळालंच पाहिजे, यातून महाराष्ट्राची बदनामी झाली आहे. त्यामुळे याची माहिती असणे गरजेचे आहे. हे एयू प्रकरण नेमकं महाराष्ट्रातील आहे की दिल्लीतील आहे? नेमकं काय? याची कागद आमच्याकडे आली आहेत, या एयू प्रकरणाचा छडा लागायला पाहिजे, या प्रकरणाची चौकशी करून याचे उत्तर हवे आहे, सभागृहाला त्याची माहिती अवगत करून द्यावी, अशी विनंतीही गोगावलेंनी केली आहे.
Join Our WhatsApp Community