राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला होणार होता. यासंदर्भातील माहिती पोलिसांना तर होतीच असे वृत्त माध्यमातून समोर आले होते. यानंतर आता पोलिसांसह सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनाही याची माहिती असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या विशेष शाखेच्या पत्रातून उघड झाली आहे. यानंतर हा हल्ला पोलिसांनी का रोखला नाही, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.
(हेही वाचा – ‘शिवतीर्था’वरील ‘बाळ’ ठाकरेंना तुम्ही पाहिले का?)
माध्यमातून समोर आलेल्या बातम्यांनुसार, सिल्व्हर ओक या पवारांच्या निवासस्थानी एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता, याची माहिती माध्यमांना होती तर मग पोलिसांना कशी या हल्ल्याची माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे विरोधकांनी पोलिसांना या हल्ल्यांची माहिती का मिळाली नाही, असा सवाल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला होता. या प्रकारानंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील चांगलेच अडचणीत आले होते. मात्र आता हे पोलिसांचं पत्रंच बाहेर आल्याने पवारांच्या घरावरील हल्ला होणार असल्याचे पोलिसांना माहित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काय म्हटले आहे पत्रात?
एसटी कर्मचारी अधिक आक्रमक होऊन आंदोलन करणार असल्याचं या पत्रात म्हटले असून हे पत्र दिनांक 4 एप्रिल रोजीचे आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी 10 नोव्हेंबर 2021 पासून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वात 10 नोव्हेंबर 2021 ते 24 नोव्हेंबर 2021 पर्यंत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्या नंतनर इतर नेत्यांच्या मार्गदर्शनात आंदोलन सुरू आहे. 5 एप्रिल 2022 रोजी न्यायालयाचा निकाल येणार असल्याने 1500 ते 1600 तरुण येऊन जाऊन आहेत. आंदोलनस्थळी आंदोलकांची संख्या वाढत आहे. विलीनिकरणाचा निर्णय आपल्या विरोधात जाण्याची जाणीव त्यांना झाली आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.